बालक हे कोणत्याही राष्ट्राची संपत्ती व भविष्य असतात. त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी भारतात केंद्र व राज्य सरकारकडून विविध कायदे बनविले गेले असून योजनाही राबविल्या जात आहेत. त्याद्वारे सुरक्षा, पोषण, आरोग्य व शिक्षण यावर भर दिला जात असतं. त्यामुळे बालकांचे जीवन सुकर बनतानाच राष्ट्राचे भविष्य म्हणजे नवी पिढी सुदृढ, शिक्षित व सुविचारी बनण्यास मदत होत आहे.