निमलष्करी दलात नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांना चांगली संधी आहे.
निमलष्करी दलात (Paramilitary Forces) नोकरी (Job) करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांना चांगली संधी आहे. त्यासाठी (CISF Recruitment 2022) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) स्पोर्ट्स कोट्यांतर्गत हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) (CISF Recruitment 2022) ही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र ज्यांना या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते सीआयएसएफ https://www.cisf.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी (CISF Recruitment 2022) उमेदवार 31 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.
याशिवाय उमेदवार या पदांसाठी https://www.cisf.gov.in/ या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकतात. http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_19113_5_2122b.pdf या लिंकद्वारे तुम्ही अधिकृत नोटिफिकेशन (CISF Recruitment 2022) देखील पाहू शकता. या भरती (CISF Recruitment 2022) प्रक्रियेअंतर्गत एकूण 249 पदे भरण्यात येणार आहेत.
सीआयएसएफ भरती 2022 साठी महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत
सीआयएसएफ भरती 2022 साठी रिक्त जागा तपशील
- हेड कॉन्स्टेबल (GD) - 249
सीआयएसएफ भरती 2022 साठी पात्रता निकष
- कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था/मंडळातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा व अॅथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व केले पाहिजे.
सीआयएसएफ भरती 2022 साठी वयोमर्यादा
- उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्षांदरम्यान असावे.
सीआयएसएफ भरती 2022 साठी अर्ज शुल्क
- उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100/- रुपये (महिला आणि एससी/एसटी) एसटी उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क दिले जाणार नाही.
सीआयएसएफ भरती 2022 साठी वेतन
- उमेदवारांना वेतन मॅट्रिक्स लेव्हल-4 (रु.25,500-81,100/-) आणि वेतन म्हणून सामान्य भत्ते दिले जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.