चांगल्या पदावर सरकारी नौकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी एक चांगली संधी समोर आली आहे. नुकतेच कोल इंडिया लिमिटेडने मॅनेजमेंट ट्रेनी भरतीसाठी नोटीफिकेशन जारी केले आहे.
इच्छूक उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया वेबसाईट www.coalindia.in वर २९ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झाली आहे. यामध्ये उमेदवार २८ नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरू शकतात. अर्जासाठीचे शुल्क भरण्याची अखेरची तारीख देखील हीच असून यानंतर अर्ज करता येणार नाहीत.