Pune News : परीक्षा विभागाच्या चौकशीसाठी समिती

परीक्षा विभागातील अनागोंदीची चौकशी करण्यासाठी अधिसभेने राजेंद्र विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीचे गठण केले
Committee to inquire the examination department Rajendra Vikhe-Patil pune
Committee to inquire the examination department Rajendra Vikhe-Patil puneesakal
Updated on

पुणे : परीक्षा विभागातील अनागोंदीची चौकशी करण्यासाठी अधिसभेने राजेंद्र विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीचे गठण केले आहे. कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी यासंबंधीची घोषणा केली.

Committee to inquire the examination department Rajendra Vikhe-Patil pune
Education: इयत्ता पहिलीत सहाव्या वर्षी प्रवेश

समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार काम पाहणार आहे. तर प्राचार्य डॉ. गजानन खराटे, विनायक आंबेकर, डॉ. अपूर्व हिरे, प्रसेनजीत फडणवीस, राहूल पाखरे, बाळासाहेब सागडे आणि डॉ. जोत्स्ना एकबोटे यांचा समावेश आहे.

सततच्या परीक्षा बदलांमुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर भरडला जात असून, विद्यापीठाची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे मत विनायक आंबेकर यांनी मांडले. ते म्हणाले, ‘‘सत्राची सुरवात, परीक्षेचे निकाल, पुढील वर्षाची सुरवात, सर्व काही कोलमडले आहे.

विविध सामाजिक कार्यक्रम, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची आंदोलनांमुळे परीक्षांचे वेळापत्रक ऐनवेळी बदलले जाते. या अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्याचे करीअर उध्वस्त होत असून, ग्रामीण आणि मागास भागातील विद्यार्थी अडचणीत सापडत आहे.’’

‘‘महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठ व्यवस्थेवर अविश्वास निर्माण करावा, अशी तयारी चालली आहे का? असा प्रश्न आंबेकर यांनी उपस्थित केला. सदस्य राहुल पाखरे म्हणाले,‘‘परीक्षा विभागाच्या सुधारणेसाठी समिती गठीत करण्यात आली. मात्र, त्या समितीची बैठकच होत नाही. विभागाचे तांत्रिक अत्याधुनिकरण गरजेचे आहे.’’

Committee to inquire the examination department Rajendra Vikhe-Patil pune
Digital Education : नव्या वर्षात महापालिकेच्या शाळेत ‘डिजिटल शिक्षण’

परीक्षा विभागात लक्ष घाला..

सर्व विभागांना पुरेसे कर्मचारी नसल्याची बाब सदस्यांनी अधिसभेच्या लक्षात आणून दिली. केवळ आरोप करून चालणार नाही, तर परीक्षा विभागाला आवश्यक सूचना करायला हवा. अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर ते किती काम करणार, असा प्रश्नही सदस्यांनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()