दर तीन महिन्यांनी होणार पगारवाढ आणि प्रमोशन, कंपनीने लढवली शक्कल

कंपनीने आता दर तीन महिन्यांनी पगारवाढ आणि प्रमोशन देण्याचा निर्णय घेतलाय.
Vipro company salary and promotion
Vipro company salary and promotionesakal
Updated on

अलीकडे कर्मचारी सोेडून जाण्यामुळे अनेक आयटी कंपनीज त्रस्त आहेत. एप्रिल आणि जून महिन्यात विप्रोने टीसीएस आणि एचसीएल सारख्या कंपन्यांन्यांपेक्षाही जास्त कर्मचाऱ्यांची भर्ती केली आहे. सुरूवातीला १५४४६ कर्मचाऱ्यांचा आकडा असणारी विप्रो कंपनी कर्मचाऱ्यांच्या भर्तीनंतर २५८५७४ कर्मचाऱ्यांवर जाऊन ठेपली. त्यामुळे कर्मचारी सोडून जाण्याचे प्रमाण थोडे कमी झाले. तरी यावर अचूक तोडगा काढत कंपनीने आता दर तीन महिन्यांनी पगारवाढ आणि प्रमोशन देण्याचा निर्णय घेतलाय. (Vipro company increasing salary and promotion)

आयटी सेक्टर गेल्या काही दिवसांत कर्मचारी अतिप्रमाणात सोडून जाण्याने संतापलेलं आहे. विप्रो किंवा टीसीएस सारख्या मोठ्या कंपन्या देखील या बाबीने त्रस्त आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी विप्रो कंपनीने एक योजना तयार केली आहे. आता दर तीन महिन्यांनी कर्मचाऱ्यांमना पगारवाढ आणि प्रमोशन देण्याची विप्रो कंपनीची तयारी आहे.

Vipro company salary and promotion
Salary Protection Insurance : तुमच्या पश्चातही सुरू ठेवा कुटुंबाचे उत्पन्न

विप्रो सीईओ डेलापोर्टे यांनी दिली माहिती

विप्रोचे चीफ एक्झीक्यूटिव ऑफिसर आणि मॅनेजिंग डायरेक्टर थियरी डेलापोर्टे यांनी कंपनीचा त्रैमासिक फायनांशियल रिजल्ट जारी केल्यानंतर प्रेस कॉन्फरंसमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. ते म्हणाले, आता दर तीन महिन्यांनी कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि प्रमोशन मिळेल. या योजनेती सुरूवात या महिन्यापासून म्हणजेच जुलैपासून होणार असल्याचेही ते म्हणाले. याचा लाभ कर्मचाऱ्यांना इथून तीन महिन्यांनी म्हणजेच थेट सप्टेंबरमध्ये पगारवाढ होऊन मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.