आधुनिक युगातील ‘स्मार्ट’ सोबती

संगणक म्हणजेच कॉम्प्युटर कार्यक्षेत्रात करिअर करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातील एक मार्ग आहे, तो म्हणजे बीएससी कॉम्प्युटर सायन्स.
Computer Education
Computer Educationsakal
Updated on

- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ

संगणक म्हणजेच कॉम्प्युटर कार्यक्षेत्रात करिअर करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातील एक मार्ग आहे, तो म्हणजे बीएससी कॉम्प्युटर सायन्स. गेल्या दोन दशकांपासून सॉफ्टवेअर क्षेत्र हे ट्रेंडिंग करिअर मानले जाते. जे मार्केटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असते, त्याचाच जास्त बोलबाला असतो. आजच्या आधुनिक काळात प्रगत तंत्रज्ञानाद्वारे अनेक महत्त्वपूर्ण कामे केली जातात.

सॉफ्टवेअर क्षेत्राचे स्वरूप लोकल ते ग्लोबल असे आहे. त्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये जाण्यासाठी इंजिनिअर बनून जसे कार्य करता येते, तसेच त्या क्षेत्रात संगणकशास्त्रातील पदवीधर होऊनही काम करता येते. आज असंख्य बीएससी पदवीधर (त्या नंतर एमसीए/एमसीएस करून) आयटी क्षेत्रात चांगले करिअर करत आहेत.

कालावधी व पात्रता

बारावी सायन्सनंतर तीन वर्षांचा हा कोर्स आहे. चार वर्षांचा ऑनर्स कोर्सदेखील काही विद्यापीठांमध्ये उपलब्ध असतो. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्ससह बारावी सायन्स उत्तीर्ण असल्यास बीएससी कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश मिळवू शकतो. बारावीच्या एकूण गुणांवर प्रवेश अवलंबून असतो. राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावर यासाठी अनिवार्य प्रवेश परीक्षा नसते. तरीही काही विद्यापीठे स्वतंत्रपणे परीक्षा घेऊ शकतात.

स्वरूप

तीन वर्षांचा अभ्यासक्रम सहा सेमिस्टरमध्ये (चार वर्षे असतील, तर आठ सेमिस्टरमध्ये) विभागलेला असतो. थिअरी लेक्चरसोबतच प्रॅक्टिकल्स असतात. प्रॅक्टिकल्समध्ये संगणकाचे पुरेपूर ज्ञान दिले जाते. प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकविल्या जातात. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जमले पाहिजे यासाठी सराव केला जातो.

ही प्रॅक्टिकल्स प्रोग्रामिंग, कोडिंग आदी सॉफ्टवेअर विषयांतील प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव येण्यासाठी असतात. गेस्ट लेक्चर, इंडस्ट्रियल व्हिजिट्स, इंटर्नशिप यांचा अंतर्भाव करणे अपेक्षित असते. कोर्सच्या शेवटी प्रोजेक्ट असतो. दरम्यानच्या काळात सेमिस्टरचे मूल्यमापन होण्यासाठी विद्यापीठीय परीक्षा नियोजित केलेल्या असतात.

अभ्यासले जाणारे विषय

ऑपरेटिंग सीस्टिम्स, कॉम्प्युटर नेटवर्क, डेटाबेस मॅनेजमेंट, डिस्क्रिट मॅथेमॅटिक्स, कम्प्युटर ग्राफिक्स, जावा प्रोग्रामिंग, डेटा स्ट्रक्चर, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, पायथॉन, थिअरी ऑफ कॉम्प्युटेशन, कॉम्प्युटर आर्किटेक्चर, सीस्टिम प्रोग्रामिंग, सी, सी प्लस प्लस प्रोग्रामिंग, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, डेटा मायनिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आदी विषय अभ्यासण्यासाठी असतात. विद्यापीठांनुसार विषय बदलू शकतात.

स्पेशलायजेशन

मुख्यतः कॉम्प्युटर विषयातील पदवी हीच मुख्य शाखा आहे. आयटी म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हीदेखील साधर्म्य असलेली शाखा आहे. दोन्हींमध्ये विशेष फरक नाही. तरीही सध्या काही विद्यापीठांमध्ये नव्यानेच पदवीस्तरावरच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी आदी विषयांमध्ये स्पेशलायजेशन्स उपलब्ध केलेले आहेत. अर्थात विद्यापीठ रचनेचा अभ्यासक्रम पाहिल्यास लक्षात येईल की, नेमका काय फरक आणि समानता एकमेकांमध्ये आहे.

उच्च शिक्षणाच्या संधी

बीएससी कॉम्प्युटर सायन्सनंतर एमएससी कॉम्प्युटर सायन्स/आर्टिफिशिअल इंटेलिजन्स/डेटा सायन्स/आयटी/सायबर सिक्युरिटी आदींमध्ये करता येते. एमसीएसारखा उत्तम कोर्स करता येतो. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिजनेस ॲनालिटिक्स, गेम डिझाइनिंग, मोबाइल ॲप डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझाइनिंग, वेब डिझाइनिंग आदींमध्ये करणे शक्य आहे. ॲनिमेशन/व्हीएफएक्स, ॲथिकल हॅकिंग, गेम डिझाइन आदी विषयांत पदव्युत्तर पदवी करणारे काही विद्यार्थी असतात.

हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्किंगसंदर्भात काही आंतरराष्ट्रीय पातळीची सर्टिफिकेशन्स घेता येतात. काही मंडळी आयआयटी किंवा अन्य नामंकित संस्थांमधील ऑनलाइन कोर्स करू शकतात. बीएससी ऑनर्सनंतर एमटेक/एमएसलादेखील प्रवेश मिळतो. याशिवाय इतर विषयांमधील उच्च शिक्षण जसे की, एमबीए, पीजी डिप्लोमा कोर्स करून उपलब्ध संधींचा विचार करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.