Teacher's Recruitment : कंत्राटीचा निर्णय वादात,प्राथमिक शिक्षक समिती आक्रमक: शिक्षण विभागाच्या निर्णयावर रोष

Teacher's Recruitment : शिक्षण विभागाच्या कंत्राटी शिक्षक नियुक्तीच्या निर्णयावर प्राथमिक शिक्षक समितीने रोष व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे शिक्षकांच्या अस्मितेला धक्का बसला असून राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Teacher's Recruitment
Teacher's Recruitment sakal
Updated on

अमरावती : राज्यातील २० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये निवृत्त शिक्षक किंवा डीएड, बीएड पात्रताधारकांची दरमहा १५ हजार रुपयांच्या वेतनावर कंत्राटी नियुक्ती करण्याचा निर्णय वादात सापडला आहे.

शिक्षकदिनीच कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा निर्णय घेऊन शिक्षण विभागाने शिक्षकांच्या अस्मितेला धक्का दिला असून, या निर्णयामुळे राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांचे नुकसान होणार असल्याची टीका राज्य प्राथमिक शिक्षक समिती संघटना तसेच पात्रताधारकांकडून करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने तातडीने निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.