ऑनलाइन बदल्यांच्या ॲपमध्ये दुरुस्त्यांचे आदेश

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांसाठी विकसित होत असलेल्या मोबाईल ॲपमधील मसुद्यात राज्य सरकारने तब्बल ३१ दुरुस्त्या करण्याचा आदेश दिला आहे.
Teachers transfer
Teachers transfersakal
Updated on
Summary

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांसाठी विकसित होत असलेल्या मोबाईल ॲपमधील मसुद्यात राज्य सरकारने तब्बल ३१ दुरुस्त्या करण्याचा आदेश दिला आहे.

पुणे - राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील (ZP School) प्राथमिक शिक्षकांच्या (Teacher) ऑनलाइन बदल्यांसाठी (Online Transfer) विकसित होत असलेल्या मोबाईल ॲपमधील (Mobile App) मसुद्यात राज्य सरकारने (State Government) तब्बल ३१ दुरुस्त्या (Repairing) करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार या ॲपसाठीच्या मसुद्यात (डेटा) समाविष्ट केलेली जिल्हानिहाय शिक्षकांची संख्या, सुगम व दुर्गम शाळांची नावे, सर्व शिक्षकांची प्राथमिक माहिती, आधार आणि पॅन कार्ड क्रमांकाची पुर्नपडताळणी करावी लागणार आहे. मोबाईल ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांसाठी एक शिक्षक, एक मोबाईल नंबर अनिवार्य केला आहे.

आगामी शैक्षणिक वर्षासाठीच्या राज्यातील शिक्षकांना घरबसल्या ऑनलाइन बदली आदेश मिळू शकणार आहेत. या मोबाईल ॲपच्या प्रगतीचा आढावा घेण्याचा आदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद आणि सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना दिला होता. त्यानुसार दोन्ही सीईओंनी या ॲपच्या प्रगतीचा आढावा घेतला.

त्यानंतर हा बदली ॲप मसुदा राज्य सरकारकडे पाठविला होता. त्यानुसार ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी या मसुद्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत बोलताना त्यांनी या मसुद्यात ३१ दुरुस्त्या करण्याचा आदेश दिला. या बैठकीला ग्रामविकास विभागातील उपसचिव का. गो. वळवी, प्रवीण जैन हेही उपस्थित होते.

सरकारने सुचविलेल्या प्रमुख दुरुस्त्या...

१. शाळांची नावे, पत्ते, तालुक्यांची खात्री करा

२. प्रत्येक शाळेसाठी स्वतंत्र युडायस (स्वतंत्र नोंदणी) क्रमांक द्या

३. शिक्षकांची जिल्हानिहाय संख्या, शालार्थ आयडी तपासणे

४. आधार आणि पॅन क्रमांक शिक्षकांचाच असल्याची खातरजमा करणे

५. प्रत्येक शिक्षकांसाठी स्वतंत्र मोबाईल नंबर जोडून घेणे

६. शिक्षकांचा प्रकार (उदा. उपशिक्षक, पदवीधर, मुख्याध्यापक) नमूद करणे

७. सुगम-दुर्गम शाळांच्या अटींची पूर्ततेची पडताळणी करणे

८. प्रत्येक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक अपलोड करणे

९. संचमान्यतेनुसार रिक्त ठेवण्यात येणारी शिक्षकांची पदे निश्‍चित करून जाहीर करा

१०. विनंती बदल्यांबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करा

११. अनुकंपा तत्त्वावरील शिक्षक भरती, पदोन्नती, पदावनतीबाबतचा आदेश काढणे

ॲप विकसित करण्याचे काम अंतिम टप्प्यात

बदल्यांसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित केले जात आहे. आयुष प्रसाद यांच्याच अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या पाच ‘सीईओं’चा समावेश असलेल्या अभ्यासगटाने राज्य सरकारला ऑनलाइन बदल्यांबाबतची शिफारस केली होती. ती शिफारस सरकारने स्वीकारत मोबाईल ॲप विकसित करण्याचे काम सुरू केले असून, ते आता अंतिम टप्प्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.