Startup : वॉशिंग मशिनमधून निघणाऱ्या पाण्याच्या ‘पुर्नरवापर’ उपकरणाची निर्मिती

भविष्यात ‘इको फ्रेंडली लाइफ स्टाईल’साठी त्यांची संकल्पना महत्त्वाची बनली
Creation of washing machine water recycling equipment startup business solapur
Creation of washing machine water recycling equipment startup business solapuresakal
Updated on

सोलापूर : मंगळवेढा येथील नवसंशोधक वैभव मोडक यांनी टाकाऊ ‘पाण्याचा पुर्नरवापर’ म्हणजे रिसायकलिंग ऑफ वॉटर’ या संकल्पनेअंतर्गत वॉशिंग मशिनमधून निघणाऱ्या पाण्याचा पुर्नरवापर करण्याचे उपकरण त्यांनी विकसित केले आहे. वाशिंग मशिनमधून मोठ्या प्रमाणावर निघणारे पाणी जे‌ पुढे ‌टॉयलेट फ्लशिंगसाठी वापरता येईल हेच ते मॉडेल त्यांनी बनविले आहे.

दरम्यान, भविष्यात ‘इको फ्रेंडली लाइफ स्टाईल’साठी त्यांची संकल्पना महत्त्वाची बनली आहे. लवकरच हे उपकरण बाजारात आणण्याच्या दृष्टीने त्यांनी या संशोधनाचे पेटंट करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या सर्व कामांसाठी त्यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ‘उद्यम इंक्युबॅशन’ केंद्राचे मार्गदर्शन लाभत आहे.

सर्वसाधारणपणे वॉशिंग मशिनमधील कपडे धुतलेले पाणी ड्रेनेज किंवा सांडपाणी म्हणून सोडून दिले जाते. प्रत्यक्षात या पाण्यात कोणतेही घातक असे पदार्थ नसतात. तसेच वॉशिंग मशिनला असलेल्या पाइपमुळे या पाण्याचे रिसायकलिंग करुन त्याचा पुर्नरवापर करता येतो. नव्या पध्दतीच्या इकोफ्रेंडली लाइफ स्टाईलमध्ये सोलार वापर, रुफ वॉटर हार्वेस्टींग या संकल्पनेच्या बरोबरीने रियुज ऑफ वॉटर म्हणजेच पाण्याचा पुर्नरवापर ही संकल्पना त्यांनी समोर आणली आहे.

शहरी जीवनशैली किंवा फ्लॅट संस्कृतीत जागेची कमतरता असल्याने त्याचा विचार करून त्यांनी या उपकरणाचा आकार कमीत कमी ठेवण्याचे प्रयत्न केले. दररोज कपडे धुण्यासाठी वापरले जाणारे पाणी वॉशिंग मशिनच्या पाइपमधून एखाद्या बादलीत गोळा केले जाते. छोट्या मोटारने ते प्रक्रिया युनिटमध्ये ते पाणी सोडले जाते. तेथे हे पाणी तुरटीने स्वच्छ करून शौचालयामध्ये स्वच्छतेसाठी म्हणजे ‘टॉयलेट फ्लशिंग’ साठी जोडता येते.

या संशोधनाची नोंद त्यांनी पेटंटसाठी करण्याचे ठरविले आहे. नजीकच्या काळात या उपकरणाचा वापर करुन गृहनिर्माण संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती या संस्था कोट्यवधी रुपयांची पाणी बचत करु शकतात. या संशोधनात्मक उपकरणाचे मोठे सकारात्मक परिणाम उमटणार आहेत.

पाणी पुर्नरवापर उपकरणाबद्दल अजूनकाही...

- वॉशिंग मशिनमधून बाहेर पडलेल्या पाण्याचा होणे शंभर टक्के पुर्नरवापर.

- अल्प खर्चात वॉशिंग मशिनमधून निघणाऱ्या संपूर्ण पाण्याचा पुर्नरवापर करणे शक्य.

- अत्यल्प खर्चात उपकरणाची उभारणी.

- अत्यल्प जागेत उभारणी होणार शक्य

- वॉशिंग मशिनचे पाणी ‘टॉयलेट फ्लशिंगसाठी उपयुक्त

- उपकरणाची पेटंट नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु

- इकोफ्रेंडली हाउसिंग टेक्नॉलॉजीत पडणार नव्याने भर

या संशोधनात्मक प्रत्येक नागरिकाला पाणी बचतीचा एक चांगला उपयोग करता येणार आहे. रोज वॉशिंग मशिनमधून वाया जाणारे अंदाजे ५० ते ८० लिटर पाणी फ्लशिंसाठी वापरता येणार आहे. या प्रमाणे हजारो घरातील करोडो लिटर पाण्याची बचत होण्यास मदत होणार आहे.

- वैभव मोडक, नवसंशोधक, मंगळवेढा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.