CUET 2022 : विद्यापीठ प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी हे करा

केवळ तयारी करून चालणार नाही कारण अशा नियोजनाची गरज आहे ज्याच्या मदतीने परीक्षेत यश मिळवता येईल.
CUET 2022
CUET 2022 google
Updated on

मुंबई : CUET च्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. CUET १५ जुलैपासून सुरू होईल. आता CUET 2022 साठी खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि विद्यार्थी उजळणीत व्यग्र आहेत. पण केवळ तयारी करून चालणार नाही कारण अशा नियोजनाची गरज आहे ज्याच्या मदतीने परीक्षेत यश मिळवता येईल. चला जाणून घेऊ या काही खास टीप्स.

CUET 2022
IBPS Clerk Recruitment 2022 : देशभरात ६०३५ पदांवर भरती

अभ्यासक्रम नीट तपासा

कोणत्याही परीक्षेत यश मिळवण्यासाठी सर्वप्रथम अभ्यासक्रमाची नीट माहिती घेणे आणि परीक्षेची संपूर्ण माहिती गोळा करणे आवश्यक आहे. तयारीसाठी अभ्यासक्रमानुसार अभ्यास करा आणि त्यानुसार वेळेचे व्यवस्थापन करा.

आवडते कॉलेज पाहा

परीक्षेची तयारी करण्यापूर्वी, प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालय आणि अभ्यासक्रम निवडा. असे केल्याने, तुम्हाला मागील वर्षाच्या कट ऑफची कल्पना येईल तसेच तुम्हाला तुमच्या आवडत्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी किती CUET गुणांची आवश्यकता आहे हे देखील कळेल.

CUET 2022
National Awards To Teachers साठी अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ

दिनक्रम निश्चित करा

तुमचा अभ्यासक्रम लहान विभागांमध्ये विभाजित करा आणि एका वेळी एका विभागावर लक्ष केंद्रित करा. सर्व विषयांना वेळ द्या आणि त्यानुसार अभ्यास करा. याशिवाय, तुम्ही आधीच अभ्यास केलेल्या विषयांची उजळणी करण्यासाठी वेळ काढा. उजळणी परीक्षेच्या तयारीत मदत करेल.

तयारीची पातळी तपासा

अभ्यास पूर्ण झाल्यावर परीक्षेचा पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न सोडवा, संकल्पनांवर काम करा आणि अंतिम परीक्षेसाठी विषय तयार करा. असे केल्याने तुमचा वेग तर वाढेलच पण परीक्षेत उत्तरे तयार करण्यातही मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()