मुलांना घडवताना...

मुलांचे पालन-पोषण हे ते ज्या कौटुंबिक संस्कृतीमध्ये वाढतात त्यावर आणि त्यांच्या आजूबाजूच्या दैनंदिन वातावरणावर अवलंबून असते.
Habits is Key for Growth
Habits is Key for Growthsakal
Updated on

प्रांजल गुंदेशा :संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस

यशस्वी मुलांचे पालनपोषण करणे हे केवळ कठोर परिश्रमाने साध्य होत नाही किंवा नशिबाचा भाग म्हणून सोडून देता येत नाही. मुलांचे पालन-पोषण हे ते ज्या कौटुंबिक संस्कृतीमध्ये वाढतात त्यावर आणि त्यांच्या आजूबाजूच्या दैनंदिन वातावरणावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे काही सवयींची सातत्यपूर्ण अंमलबजावणी करणेही गरजेचे असते. या मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये आपण अशाच काही वेगळ्या सवयींची माहिती घेणार आहोत.

सर्वोत्तम प्रशिक्षकाची नियुक्ती

तुमच्या आयुष्यातील सर्वांत महत्वाची माणसे तीच असतात की, जे तुमच्यातील क्षमतांना तुमच्यापेक्षाही जास्त ओळखतात. यामध्ये पालकांप्रमाणे प्रशिक्षक किंवा शिक्षक असतात. एक उत्तम प्रशिक्षक केवळ तुमच्या मुलाची क्षमता ओळखून त्यावर काम करतो असं नाही, तर तो त्या मुलातील आत्मविश्वास वाढवतो. त्याला स्वतःचा मार्ग दाखवतो. सजग पालक कधीही हाच विचार करतात की, एखाद्या प्रचंड व्यग्र किंवा केवळ प्रसिद्धीच्या जोरावर मोठ्या झालेल्या शिक्षकाकडे आपल्या मुलांना नेण्यापेक्षा एखाद्या हाडाच्या शिक्षकाकडे त्यांना पाठवावे. तळमळीने शिकवणाऱ्या शिक्षकांनी दिलेला एक तासदेखील इतरांनी दिलेल्या १० तासांपेक्षा अधिक फलदायी असतो. त्यामुळे असे पालक सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांना भेटतात. त्या वेळी होणाऱ्या खर्चापेक्षा ते दीर्घकालीन परिणामाचा विचार करतात. लक्षात ठेवा, ऑलिम्पिक विजेते आणि पराभूत खेळाडू यांच्यातील फरक फक्त काही सेकंदांचा असतो आणि हे काही सेकंद म्हणजेच त्यांच्या प्रशिक्षकाने त्यांच्यावर घेतलेली मेहनत असते.

काम करण्याची सवय

हॉर्वर्ड विद्यापीठातील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, मुलाच्या भविष्यातील यशाचा अंदाज लावणारी सर्वांत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे त्यांनी लहानपणी केलेली कामे. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच छोटी व स्वतःची कामे करण्यास प्रोत्साहन द्या. नवीन कामे शिकवा. त्यासाठी त्यांना मदत करा. यामुळे त्यांना जबाबदारीची जाणीव होईल. मुलांमधील नम्रता व कर्तव्यभावनावाढीस लागेल.

कौटुंबिक दैनंदिनी

कौटुंबिक दैनंदिनी खूप प्रभावी असते. सातत्याने त्याच त्या गोष्टी कुटुंबासोबत केल्यात की, त्यांचा एक सांस्कृतिक ठेवा तयार होतो. काही गोष्टी अनुवांशिकतेने पुढच्या पिढीला मिळतात. या सर्व घटकांचा व्यक्तिमत्त्वावर खूप प्रभाव पडतो. त्यामुळे निजायची वेळ, वाचन, जेवण किंवा प्रार्थनेची वेळ हे सर्व ठरवा. दर आठवड्याला एखादा खेळ खेळणं, महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणं अशा अनेक गोष्टी आवर्जून कराव्यात. सजग पालक कौटुंबिक दिनचर्येला प्राधान्य देतात आणि मुलांना योग्य तेवढा वेळही देतात. त्यामुळे मुलं जशी मोठी होतात तसं या सर्व गोष्टी त्यांच्या स्मरणात राहतात आणि त्यांना अनेक नव्या गोष्टी करण्याची प्रेरणाही देतात.

Habits is Key for Growth
भारताची 'INS Vikrant' जगात भारी!

मुलांचे सामाजिक वर्तुळ

आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळे आपण घडतो असं म्हटलं जातं. त्यामुळे आपण कोणासोबत किती व कसा वेळ घालवतो, हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. सजग पालकांना या गोष्टीची पूर्ण जाणीव असते. त्यामुळे ते शाळा, महाविद्यालय आणि शेजारच्या परिसरातील चांगल्या लोकांची संगत आपल्या मुलांना मिळावी यासाठी प्रयत्न करतात. मुलांचे सामाजिक वर्तुळ जाणून घेतात. समवयस्कांचा प्रभाव तुमच्या मुलांच्या जीवनावर अपरिहार्यतेने पडतो. त्यामुळे तो प्रभाव चांगल्या लोकांचाच असेल याची खात्री करा व त्यासाठी योग्य ती काळजी घ्या.

मानसिक जडण-घडण

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांचे पालक आपल्या पाल्यांच्या मानसिकतेवर काम करतात. त्यांची योग्य प्रकारे मानसिकदृष्ट्या जडण-घडण करतात. ते त्यांच्या मुलांना अपयशाकडे शिकण्याच्या संधी म्हणून पाहण्यास शिकवतात. आपले शब्द आणि कृती विचारपूर्वक असावी असे मुलांना शिकवतात. प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता शोधण्यास प्रोत्साहन देतात. जे सोयीस्कर आहे तेवढेच करण्यापेक्षा कठोर परिश्रम करण्यासही ते आपल्या मुलांना प्रोत्साहित करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.