Cyber Security : सायबर सिक्युरिटी करिअरचा उत्तम पर्याय!

दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर प्रचंड वेगाने वाढत आहे. आजकाल सर्व काही ऑनलाइन, डिजिटल झाले आहे.
cyber security is great career option education
cyber security is great career option educationSakal
Updated on

- प्रा. सुभाष शहाणे

दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर प्रचंड वेगाने वाढत आहे. आजकाल सर्व काही ऑनलाइन, डिजिटल झाले आहे. छोटे-छोटे पेमेंटही फोन पे, गुगल पे, पेटीएम याद्वारे केले जातात. विविध प्रकारचे अॅपही कार्यरत आहेत. सध्या विविध कामे उदा. - आर्थिक व्यवहार, बँक व इन्शुरन्सचे व्यवहार, टॅक्स पेमेंट-रिटर्न, दैनंदिन कार्यालयीन कामकाज, पत्रव्यवहार, इ.मेल, अकाउंटस वगैरे कामकाज संगणकाद्वारे ऑनलाइन चालते.

विविध आय. टी. कंपन्या उपयुक्त सॉफ्टवेअर व अॅप बनवितात, तसेच रॉयल्टी घेऊन वापरण्यास देतात. उदा. - इन्फोसिस कंपनीने बँकांसाठी फिनाकल नावाचे सॉफ्टवेअर बनविले आहे.

अशारीतीने देशात इंटरनेट युजर्सची संख्या प्रचंड वाढली आहे. इंटरनेटचे फायद्यांप्रमाणे तोटेही आहेत. सायबरमध्ये इंटरनेटचा डेटा, महत्त्वाची माहिती, पासवर्ड, फाईल्स आदींचा समावेश होतो. सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा.

सायबर सिक्युरिटीमध्ये डेटाची चोरी, अनधिकृत वापर, सायबरचा हल्ला आदी विविध विषयांचा अंतर्भाव होतो. संगणकावरील डेटा सुरक्षित ठेवण्याची गरज व्यक्ती, कंपन्या, बँका, केंद्र व राज्य सरकारला आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटीचे काम करू शकणाऱ्या व्यक्तींना दिवसेंदिवस मागणी वाढत असून मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी निर्माण झालेल्या आहेत.

सायबर सिक्युरिटी कोर्सेस/पदवी

सायबर सिक्युरिटी विषयी बी.बी.ए. (सी.ए.) ः हा ३ वर्षांचा पदवी कोर्स भारतातील अनेक विद्यापीठे चालवितात. त्यामध्ये सायबर सिक्युरिटी या विषयाचा समावेश केलेला आहे. याप्रमाणेच डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटीसाठी बी.एस्सी-आय.टी, एम.कॉम, बी.एस्सी-डेटा सायन्स आदी. पदवी कोर्स उपलब्ध आहेत.

तसेच ६ महिन्यांचे डिप्लोमा कोर्सेसही खासगी संस्था चालवितात. याप्रमाणेच काही अॅडव्हान्स लेव्हल सायबर सिक्युरिटी प्रोग्रॅम्स उपलब्ध आहेत. उदा. - सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, सर्टिफाइड इथिकल हॅकर्स, सर्टिफाइड इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिटर.

सायबर सिक्युरिटीमधील विविध पदे

  •  चीफ इन्फार्मेशन सिक्युरिटी ऑफिसर

  •  मालवेअर ॲनालिस्ट

  •  सायबर सिक्युरिटी ॲनालिस्ट

  •  नेटवर्क सिक्युरिटी आर्किटेक्ट

  •  नेटवर्क सिक्युरिटी इंजिनिअर

  •  क्वाऊड सिक्युरिटी इंजिनिअर

  •  बग बॉँट्री स्पेशालिस्ट

अशा रीतीने सायबर सिक्युरिटीचे महत्त्व सध्याच्या काळात वाढलेले आहे. तसेच नोकरी व करिअरच्या संधीही मोठ्या प्रमाणावर खुणावत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.