नवी क्षितिजे : हवाई सुंदरी व विमानसेवक

हवाई वाहतूक कंपन्यामध्ये १८ ते २५ वर्षे वयोगटातील अविवाहित उमेदवार हवाई सुंदरी वा विमान सेवक पदांसाठी अर्ज करू शकतात.
Air hostess
Air hostesssakal
Updated on
Summary

हवाई वाहतूक कंपन्यामध्ये १८ ते २५ वर्षे वयोगटातील अविवाहित उमेदवार हवाई सुंदरी वा विमान सेवक पदांसाठी अर्ज करू शकतात.

सकाळचा चहा मुंबईत, दुपारचे जेवण चेन्नईला तर रात्रीचा मुक्काम बंगळूर येथे. ज्यांना एवढे गतिमान जीवन करिअर म्हणून अपेक्षित असेल त्यांनी हवाई वाहतूक कंपनीत हवाई सुंदरी वा विमान सेवक म्हणून अवश्य जावे. हवाई वाहतूक कंपनीत प्रवासी वाहतूक सेवेत हवाई सुंदरी वा विमानसेवक म्हणून काम करणाऱ्यांना आकर्षक पगारासह विविध प्रकारचे फायदे उपलब्ध असल्याने अनेक नवागतांचे असा रोजगार मिळविणे हे एक स्वाभाविक स्वप्न असते.

हवाई वाहतूक कंपन्यामध्ये १८ ते २५ वर्षे वयोगटातील अविवाहित उमेदवार हवाई सुंदरी वा विमान सेवक पदांसाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी उमेदवारांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. यापैकी हवाई सुंदरीसाठी अर्जदारांची उंची ५ फूट ५ इंच तर विमानसेवक पदासाठी उमेदवारांची उंची ५ फूट ८ इंच असावी.

उमेदवारांकडे हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी, पर्यटन व्यवस्थापन यासारख्या संबंधित विषयातील पदवी असणे अलिखित पात्रता समजली जाते. या शिवाय हवाई वाहतूक सेवा क्षेत्रात ग्राहक-प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी भाषा हे एक प्रभावी व आवश्यक माध्यम असल्याने उमेदवारांचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे व त्यांना हिंदीसह प्रादेशिक भाषांचे ज्ञान असणे फायदेशीर ठरते.

बहुतांश हवाई वाहतूक कंपन्या हवाई सुंदरी व विमान सेवक पदांसाठी नेमणूक करताना प्रमुख वृत्तपत्रात जाहिरात देतात. अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना निवड परीक्षा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्यातून उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते.

वरीलप्रमाणे निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात ग्राहकसेवा, खानपानसेवा, संभाषणकला, सुरक्षा, प्रथमोपचार, आपत्कालीन कारवाई, भाषा व संवादकला आदींची विशेष प्रशिक्षण दिले जाते. अशाप्रकारे देशांतर्गत हवाई वाहतूक कंपन्यांत हवाईसुंदरी व विमानसेवक म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना भविष्यात आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्र वा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. हवाई सुंदरी व विमान सेवकांना साधारणपणे आठवड्यातून ३० तास हवाई प्रवासासह काम करावे लागते. या क्षेत्रात काम करण्यासाठी तत्पर, हसतमुख असणे ही मूलभूत आवश्यकता असते.

शिवाय रोज घराबाहेर व प्रसंगी आपल्या राहण्याच्या घरापासून सतत टूरवर व प्रसंगी आणि कामाच्या स्वरूपानुसार विविध शिफ्टमध्ये काम करणे आवश्यक असते. नित्य प्रवासयोग असणारा रोजगार आव्हानपर स्वरूपात स्वीकारायचा असल्यास अशा विद्यार्थी, युवा उमेदवारांनी या क्षेत्रातील प्रवेशासाठी अवश्य प्रयत्न करावेत. पर्यटनाच्या सततच्या वाढ व व्यावसायिक वृद्धीमुळे विमान वाहतूक क्षेत्रात निर्माण होत असलेल्या व होऊ घातलेल्या प्रशिक्षित गरजेपोटी या क्षेत्रात रोजगारक्षमता व शक्यता नेहमी उपलब्ध असते ही बाब उल्लेखनीय ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.