वेगळी वाट : मत्स्यविज्ञान क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रम

केंद्र सरकारच्या मत्स्यविज्ञान, पशू चिकित्सा व दुग्धोत्पादन मंत्रालयांतर्गत असणाऱ्या दोन विशेष पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
Fisheries
Fisheriessakal
Updated on
Summary

केंद्र सरकारच्या मत्स्यविज्ञान, पशू चिकित्सा व दुग्धोत्पादन मंत्रालयांतर्गत असणाऱ्या दोन विशेष पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

केंद्र सरकारच्या मत्स्यविज्ञान, पशू चिकित्सा व दुग्धोत्पादन मंत्रालयांतर्गत असणाऱ्या दोन विशेष पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

मत्स्यविज्ञान क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रम : कालावधी ४ वर्षे

  • आवश्यक शैक्षणिक पात्रता - अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र व जीवशास्त्र अथवा भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र व गणित हे विषय घेऊन व कमीत कमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी गुणांची टक्केवारी शिथिलक्षम आहे.

  • विशेष सूचना - जे विद्यार्थी यंदा वरील पात्रता परीक्षेला बसले असतील ते सुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत.

  • वयोमर्यादा - अर्जदार विद्यार्थी १८ ते २० वर्षे वयोगटातील असावेत. वयोमर्यादेची अट राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम.

  • उपलब्ध जागा - अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या ४५ असून यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.

  • निवड प्रक्रिया - अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची निवड परीक्षा २ जुलै २०२२ घेण्यात येऊन त्या आधारे त्यांची अभ्यासक्रमात निवड करण्यात येईल.

  • अर्जासह भरावयाचे शुल्क - अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांनी आपल्या प्रवेश अर्जासह प्रवेश शुल्क म्हणून ५०० रुपये (राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी २५० रुपये) संगणकीय पद्धतीने bharatkosh.gov.in या संकेतस्थळावर भरणे आवश्यक आहे.

नौकानयन/मरिन फिटर विषयांतील अभ्यासक्रम : कालावधी २ वर्षे

  • आवश्यक शैक्षणिक पात्रता - अर्जदारांनी दहावीची परीक्षा कमीतकमी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. अथवा ते या पात्रता परीक्षेला बसलेले असावेत.

  • उपलब्ध जागा - वरील अभ्यासक्रमासाठी एकूण जागांची संख्या ४० असून यापैकी काही जागा मच्छीमार समाजातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.

  • निवड प्रक्रिया - अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी निवड परीक्षा १६ जुलै २०२२ रोजी घेण्यात येऊन त्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

  • अर्जांसह भरावयाचे शुल्क - अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी ३०० रुपये (राखीव गटातील उमेदवारांसाठी १५० रुपये) संगणक पद्धतीने bharatkosh.gov.in या संकेतस्थळावर भरणे आवश्यक.

  • अधिक माहिती व तपशील - वरील अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एम्लॉयमेंट न्यूज अथवा रोजगार समाचार च्या १४ ते २० मे २०२२ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पहावी.

  • अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख - संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील तसेच कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज दि डायरेक्टर, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज नॉटिकल इंजिनिअरिंग ट्रेनिंग, फाइन आर्ट्स ॲव्हेन्यू, कोचिन ६८२०१६ या पत्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० जून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.