छायाचित्र क्षेत्रातील ‘क्लिक’

‘फोटोग्राफी’ म्हणजेच छायाचित्रकलेचे स्वरूप वेगाने बदलले असले तरीही या क्षेत्राला नेहमीच मोठी मागणी आहे.
Dattatreya Ambulkar writes career in photography
Dattatreya Ambulkar writes career in photography sakal
Updated on
Summary

फोटोग्राफी क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचे करिअर करण्याची इच्छा व आवड असेल अशा विद्यार्थ्यांसाठी करिअर बरोबरच नाव कमावण्याची संधी छायाचित्र कलेद्वारे नेहमीच उपलब्ध असते.

‘फोटोग्राफी’ म्हणजेच छायाचित्रकलेचे स्वरूप वेगाने बदलले असले तरीही या क्षेत्राला नेहमीच मोठी मागणी आहे. या क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचे करिअर करण्याची इच्छा व आवड असेल अशा विद्यार्थ्यांसाठी करिअर बरोबरच नाव कमावण्याची संधी छायाचित्र कलेद्वारे नेहमीच उपलब्ध असते.

छायाचित्र क्षेत्रात करिअर, व्यवसाय सुरू करण्यासाठी विशेष पात्रतेची आवश्यकता नसते. त्यामुळे ज्यांना दहावी, बारावी नंतर कुठल्याही कारणाने रोजगार व्यवसायाची निवड करणे आवश्यक असेल अशांनी संभ्रम न ठेवता छायाचित्र क्षेत्रात शिक्षण प्रावीण्य मिळवून रोजगाराची संधी अवश्य उपलब्ध करून घ्यावी. नमूद केल्याप्रमाणे छायाचित्र कलेवर आधारित औपचारिक पात्रतेची आवश्यकता नसली तरी संबंधितांकडे कल्पकता, वेगळेपण जाणण्याची आणि जपण्याची क्षमता व पात्रता याशिवाय समयसूचकता, परिश्रमी वृत्ती असावी.

छायाचित्र क्षेत्रातील औपचारिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर संबंधितांना नोकरी व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध असतात. विविध प्रकाशने, दैनिके आणि जाहिरात एजन्सीसाठी काम करता येते. टीव्हीवर सातत्याने दिसणाऱ्या मालिका व विविध कार्यक्रम, वाहिन्या व त्याशिवाय लघुपट-चित्रपट निर्मितीमध्ये देखील या उमेदवारांना संधी असतात.

याशिवाय विविध वैज्ञानिक प्रयोगशाळा, औद्योगिक क्षेत्र व संशोधन केंद्रांमध्ये छायाचित्रकारांना मागणी असते. याशिवाय या क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी उमेदवारांना स्वतःचा व्यवसायही सुरू करता येतो. त्याद्वारे लग्न-विवाह किंवा सामाजिक संस्थांपासून ते निवडणूक प्रचार प्रसंगांपर्यंत छायाचित्रण व छायाचित्रकारांची आवश्यकता असल्याने या क्षेत्रात रोजगार, स्वयंरोजगाराचा लाभ घेता येईल.

छायाचित्रण विषयातील अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्रातील संपर्क संस्था पुढीलप्रमाणे

  • जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट््‌स , मुंबई-४०००९८

  • गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, सांताक्रूझ, मुंबई-४०००९८

  • फर्ग्युसन विद्यालय, पुणे-४११ ००४

  • इन्स्टिट्यूट ऑफ ऑडिओ व्हिज्युअल एज्युकेशन अँड कम्युनिकेशन, ७५६, सदाशिव पेठ,

  • पुणे-४११०३०

  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी, शिवाजी पेठ, कोल्हापूर-४१६ ०१२

  • एसएनडीटी महाविद्यालय, मरिन लाइन्स, मुंबई-४०००२०

  • सेंट झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन, सेंट झेविअर्स कॉलेज फोर्ट, मुंबई-४००००१

  • के. जे. सोमय्या महाविद्यालय, विद्याविहार, मुंबई विवेकानंद एज्युकेशन सोसायटी, चेंबूर, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.