RTE Admission : ‘आरटीई’ अर्जांसाठी १० मेपर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने १० मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी ३० एप्रिलपर्यंत मुदत होती.
RTE Admission
RTE Admission sakal
Updated on

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने १० मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी ३० एप्रिलपर्यंत मुदत होती.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ७६ हजार ५२ शाळांमधील आठ लाख ८६ हजार ४११ जागांकरिता मंगळवारी रात्रीपर्यंत केवळ ६२ हजार २७७ अर्ज आले होते. अधिकाधिक पालकांनी अर्ज भरावेत म्हणून मुदतवाढ दिल्याचे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.

आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या. यंदा प्रवेशासाठी सरकारी, अनुदानित शाळांमधील प्रवेशाचा पर्याय प्राधान्याने दिसणार आहे.

RTE Admission
RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

संबंधित बालकांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तरच त्या स्वंयअर्थसहाय्यित शाळेत आरटीई जागांवर प्रवेश मिळेल, असा नवा निर्णय सरकारने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.