Narayan Rane : D.Ed बेरोजगारांना मिळणार न्याय? शिक्षक भरतीबाबत नारायण राणेंनी दिलं मोठं आश्वासन

नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिकांना न्याय देण्यासाठी पोर्टलमधूनच पूर्वीचे कोकण निवड मंडळ स्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली.
Narayan Rane News
Narayan Rane NewsEsakal
Updated on
Summary

जूनपासून शाळा सूरू होऊन पाच महिने झाले, तरी काही शाळांना शिक्षक मिळाला नाही.

कळणे : सद्यस्थितीत होणारी भरती ही पवित्र पोर्टलमार्फत राज्यस्तरीय भरती प्रक्रिया असल्याने २०१० प्रमाणे स्थानिकांना पुन्हा डावलण्याची भीती आहे. गेली १० वर्षे भरती न झाल्यामुळे येत्या शिक्षक भरतीत जिल्ह्यातील उमेदवारांना संधी न मिळाल्यास त्यांची वयोमर्यादा संपणार आहे.

Narayan Rane News
Kolhapur : मोदींची ताकद वाढवण्यासाठी तिकडे गेले, मग शरद पवारांची ताकद का वाढवली नाही; रोहित पवारांचा मुश्रीफांना सवाल

त्यामुळे पोर्टलमधूनच पूर्वीचे कोकण निवड मंडळ स्थापन करून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक डी.एड. बेरोजगारांना न्याय द्यावा, अशी मागणी डी.एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भेट घेऊन करण्यात आली.

याबाबत येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री सचिवांची मंत्रालय पातळीवर एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढू, असा शब्द यावेळी मंत्री राणे यांनी दिला. जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगारांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री राणे यांची डी.एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथे नुकतीच भेट घेतली.

यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, भाजप दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, अजय परब, समीर ठाकूर आदी उपस्थित होते.

Narayan Rane News
Sharad Pawar : 'बाप हा बापच असतो'; शरद पवारांच्या दौऱ्यापूर्वीच कोल्हापुरात बॅनरबाजी, शक्तीप्रदर्शनाने वातावरण तापणार

स्थानिक डी.एड. बेरोजगारांना २७ मार्चपासून केलेल्या १४ दिवसांचे उपोषणास राणे यांनी भेट देऊन न्याय देणार, म्हणून आश्वासित केले होते. जूनपासून शाळा सूरू होऊन पाच महिने झाले, तरी काही शाळांना शिक्षक मिळाला नाही. स्थानिकांना त्या शाळेत शिक्षक म्हणून संधी द्यावी, यासाठी प्रयत्न झाले; पण स्थानिकांवर प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केले. त्यावर लक्ष वेधण्यासाठी व मागील पाठपुरावा करण्यासाठी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री राणे यांची भेट घेतली.

Narayan Rane News
D.Ed Course : 'डी. एड्.'ला उतरती कळा! अनुदानित विद्यालयांमध्ये अवघे 45 विद्यार्थी, 'इतक्या' संस्था झाल्या बंद

स्थानिक डी.एड. बेरोजगारांना २७ मार्चपासून केलेल्या १४ दिवसांचे उपोषणास राणे यांनी भेट देऊन न्याय देणार, म्हणून आश्वासित केले होते. जूनपासून शाळा सूरू होऊन पाच महिने झाले, तरी काही शाळांना शिक्षक मिळाला नाही. स्थानिकांना त्या शाळेत शिक्षक म्हणून संधी द्यावी, यासाठी प्रयत्न झाले; पण स्थानिकांवर प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केले. त्यावर लक्ष वेधण्यासाठी व मागील पाठपुरावा करण्यासाठी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री राणे यांची भेट घेतली.

‘जिल्ह्यातील उमेदवारांना संधी द्यावी’

सद्यस्थितीत होणारी भरती ही पवित्र पोर्टल मार्फत राज्यस्तरीय भरती प्रक्रिया असल्याने २०१० प्रमाणे स्थानिकांना पुन्हा डावलण्याची भीती यावेळी संबंधितांकडून व्यक्त करण्यात आली. गेली १० वर्षे भरती न झाल्यामुळे येत्या शिक्षक भरतीत जिल्ह्यातील उमेदवारांना संधी द्यावी; अन्यथा त्यांची वयोमर्यादा संपून जाण्याची भीती आहे.

Narayan Rane News
CM Siddaramaiah : 'या' कारणासाठी काँग्रेस सरकारची कायदेशीर लढाई सुरूच राहणार; कर्नाटकचं शिष्टमंडळ घेणार मोदींची भेट

त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिकांना न्याय देण्यासाठी पोर्टलमधूनच पूर्वीचे कोकण निवड मंडळ स्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली. याबाबत येत्या आठ दिवसांत मंत्रालय पातळीवर एकत्रित बैठक घेऊन यावर तोडगा काढू, अशी ग्वाही मंत्री राणे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.