आर्किटेक्चरची पदवी

आर्किटेक्चर म्हणजे वास्तुरचनाशास्त्र. घर, इमारत, बंगला, सार्वजनिक बांधकामे, मंदिर, पूल आदी बांधकामे चालू करण्यापूर्वी त्याची शास्त्रोक्त रचना केली जाते.
Degree in Architecture
Degree in Architecturesakal
Updated on

- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ

आर्किटेक्चर म्हणजे वास्तुरचनाशास्त्र. घर, इमारत, बंगला, सार्वजनिक बांधकामे, मंदिर, पूल आदी बांधकामे चालू करण्यापूर्वी त्याची शास्त्रोक्त रचना केली जाते. या शास्त्रामध्ये बांधकाम प्रक्रियेचे नियम लक्षात घेऊन संबंधित वास्तूचे डिझाइन केले जाते. यामध्ये वास्तूची उपयुक्तता, सुरक्षितता, भक्कम रचना, त्याचबरोबर सौंदर्य या बाबींचा विचार केलेला असतो. हे काम करणारा तज्ज्ञ आर्किटेक्ट नावाने ओळखला जातो. आर्किटेक्टचे शिक्षण बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हे असते.

पात्रता व कालावधी

आर्किटेक्चर पदवीच्या शिक्षणाचा कालावधी बारावीनंतर पाच वर्षे इतका आहे. विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्ससह बारावी सायन्स उत्तीर्ण असावा. अपेक्षित टक्केवारी ५०% गुण (आरक्षित गटांसाठी ४५%. यामध्ये बदल होऊ शकतात.) डिप्लोमाधारकसुद्धा आर्किटेक्चर पदवीसाठी पात्र असतात. नाटा (नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर) किंवा जे.ई.ई. पेपर २ या पदवीसाठीच्या प्रवेश परीक्षा आहेत.

विषय

बेसिक डिझाईन, आर्किटेक्चरल ड्रॉइंग, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरिअल्स, थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स, आर्किटेक्चरल डिझाइन, कॅड, बिल्डिंग सर्व्हिस, लँडस्केप आर्किटेक्चर, साइट सर्व्हे, क्लायमॅटॉलॉजी आदी विषय अभ्यासण्यासाठी असतात. या अभ्यासक्रमात ऐच्छिक विषय आणि संबंधित ऑडिट कोर्सेससुद्धा समाविष्ट असतात. इंटिरिअर डिझाइन, ग्राफिक डिझाइन, इंडस्ट्रिअल बिल्डिंग डिझाइन, प्रॉडक्ट डिझाईन आदी विषय ऐच्छिक असतात.

कोर्सचे स्वरूप

पाच वर्षांच्या कालावधीमध्ये १० सेमिस्टर असतात. प्रत्येक सेमिस्टरमध्ये इन सेमिस्टर, एन्ड सेमिस्टर परीक्षा असतात. थिअरी विषयांना प्रॅक्टिकल्सची जोड असते. लेखी परीक्षांसोबतच तोंडी परीक्षादेखील असतात. त्यातच इंटर्नल सेशनल मार्क्स हे सातत्यपूर्ण गुणवत्तेच्या निकषावर दिले जातात. पाचव्या वर्षात प्रॅक्टिकल ट्रेनिंगची तरतूद करण्यात आली आहे. या अंतिम वर्षात आर्किटेक्चरल प्रोजेक्टदेखील करावयाचा असतो. प्रॅक्टिकल्समध्ये स्टुडिओ सेशन्स असतात. खूप महत्त्वाचे म्हणजे अभ्यासक्रमात असणाऱ्या साइट व्हिजिट्स विद्यार्थ्यांना अधिक चांगला दृष्टिकोन देऊ शकतात. प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव देणारी इंटर्नशिप हा आर्किटेक्चरल कोर्सचा अंतिम टप्पा असतो.

पदवीनंरची पदे

आर्किटेक्ट, प्रोजेक्ट आर्किटेक्ट, आर्किटेक्चर डिझायनर, प्रिन्सिपल आर्किटेक्ट, लँडस्केप आर्किटेक्ट, अर्बन डिझायनर, टाऊन प्लॅनर, इंटिरियर डिझाइन कन्सल्टंट, आर्किटेक्चर जर्नलिस्ट, हेरिटेज अँड कॉन्झर्वेशन स्पेशालिस्ट इत्यादी.

संधी

खासगी क्षेत्रात कंपन्यांमध्ये ज्युनियर आर्किटेक्टसारख्या पदांवरून सुरुवात करून नंतर वर उल्लेख केलेल्या पदांपर्यंत मजल मारता येते. लँडस्केप, इंटिरिअरसारख्या अनेक विभागात तज्ज्ञ म्हणून काम करता येते. शासकीय क्षेत्रातदेखील पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, नॅशनल बिल्डिंग ऑर्गनायझेशन, अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, भारतीय रेल्वे, स्टेट हाऊसिंग बोर्ड, सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आदी ठिकाणी रुजू होता येते.

स्वतःचा व्यवसाय असणे हे आर्किटेक्चरमधील उत्तम करिअर मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.