घरकाम करणाऱ्या कुटुंबातील धनश्री झाली सीए

‘कुटुंबातील सर्व सदस्य, आजी-आजोबांचे आशीर्वाद, शाळा, क्लास, कॉलेजचे प्राध्यापक माझ्या पाठीमागे आहेत. ही फार महत्वाची बाब आहे. हितचिंतकांच्या प्रोत्साहनामुळे आणि पाठिंब्यामुळे हे यश प्राप्त झाले’, असे धनश्री म्हणते.
Dhanashri Hiranwale
Dhanashri HiranwaleSakal
Updated on
Summary

‘कुटुंबातील सर्व सदस्य, आजी-आजोबांचे आशीर्वाद, शाळा, क्लास, कॉलेजचे प्राध्यापक माझ्या पाठीमागे आहेत. ही फार महत्वाची बाब आहे. हितचिंतकांच्या प्रोत्साहनामुळे आणि पाठिंब्यामुळे हे यश प्राप्त झाले’, असे धनश्री म्हणते.

पुणे - अरण्येश्वर भागातील गवळीवाड्यात दोन खोल्यांचे घर. आर्थिक स्थिती बेताचीच. आई घरकाम करणारी, तर वडिलांचीही तुटपुंज्या पगाराची नोकरी. या परिस्थितीत लहानाची मोठी झालेल्या धनश्री हिरणवाळे (Dhanashri Hiranwale) हिने दहावीनंतर सीए (CA) होण्याचा निर्णय घेतला. कोणीही अनुभवी मार्गदर्शक नाही किंवा अभ्यासासाठी महागडे क्लासेस लावण्याची परिस्थिती नाही. होती ती फक्त दांडगी इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी. मात्र त्याच जोरावर धनश्रीने केवळ एकाच प्रयत्नात सनदी लेखापाल परिक्षेच्या सर्व पातळ्या उत्तीर्ण (Pass) केल्या. गेल्या आठवड्यात लागलेल्या निकालाने तिच्या सीए होण्याच्या यशावर शिक्कामोर्तब केले.

‘कुटुंबातील सर्व सदस्य, आजी-आजोबांचे आशीर्वाद, शाळा, क्लास, कॉलेजचे प्राध्यापक माझ्या पाठीमागे आहेत. ही फार महत्वाची बाब आहे. हितचिंतकांच्या प्रोत्साहनामुळे आणि पाठिंब्यामुळे हे यश प्राप्त झाले’, असे धनश्री म्हणते. धनश्रीची आजी लक्ष्मीबाई, आसपासच्या बंगल्यांतून, सोसायट्यांमधून १९८० पासून घरकाम करत होती. त्यानंतर तिची आई अर्चना, काकू पूजासुद्धा आज तेच काम करत आहेत. वडील एका छोट्या कंपनीत कामाला तर काका रिक्षाचालक. या सर्वांच्या अपार श्रमांची जाणीव तिला आहे. दोन खोल्यांतून आपल्या एकत्र कुटुंबातील चुलत सख्ख्या भावंडांसोबत ती राहते.

Dhanashri Hiranwale
रिझर्व्ह बँकेच्या 'या' परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; असा पहा Result

धनश्रीने मिळवलेल्या या यशाने कुंटुंबातून आणि परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कितीही खडतर परिस्थिती असली तरी त्याबाबत तक्रार करत बसण्यापेक्षा त्यातून जिद्दीने मार्ग कसा काढायचा, याचे धनश्री जिवंत उदाहरण आहे. तिच्या या यशाने तिच्यासारख्या अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. मात्र घवघवीत यश मिळवूनही तिचे पाय जमिनीवर आहेत. केवळ यावरच समाधान न मानता पुढे अजून शिकण्याचा तिचा मानस आहे. पुढे तिला सी.एफ्.ए. (चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट) करण्याची इच्छा आहे. तसेच आता चांगली नोकरी मिळून आर्थिक स्थैर्य येऊ शकत असल्याने आई-वडिलांचे कष्ट कमी होणार असल्याचे समाधान ती व्यक्त करते.

‘जिद्दीनेच मिळाले यश’

‘सीए होण्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. सीएच्या परिक्षा अतिशय कठीण असतात. त्यात खासगी क्लासेसमध्ये जाऊन अभ्यास करणे, मला शक्य नव्हते. मार्गदर्शन करणारी कोणी अनुभवी व्यक्ती नव्हती. त्यात अनेकांनी नाऊमेद करण्याचाही प्रयत्न केला. ‘सीए होणे सोपे नसते, ते तुला जमणार नाही, त्यापेक्षा बँकेच्या परिक्षा दे’, असे सल्लेही दिले. मात्र कॉमर्सला आलो आहोत, तर सीएच करायचे, हा माझा ठाम निश्चय होता. याच निश्चयाने आणि जिद्दीने यश मिळाले’’, अशी भावना धनश्रीने व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.