UPSC Job : यूपीएससीमध्ये थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार खाली दिलेल्या अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.
UPSC
UPSCgoogle
Updated on

मुंबई : युनियन लोकसेवा आयोगाने भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ज्यानुसार UPSC सहाय्यक मृदसंधारण अधिकाऱ्यासह अनेक पदांची भरती करणार आहे. आजपासून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. (direct recruitment in UPSC government job without exam )

अधिकृत साइट upsc.gov.in वर जाऊन उमेदवार या मोहिमेसाठी अर्ज करू शकतील. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ मे २०२३ ही निश्चित करण्यात आली आहे.

या मोहिमेद्वारे सहाय्यक मृदसंधारण अधिकारी पदाच्या २ जागा, अतिरिक्त सहाय्यक संचालक पदाच्या ३ जागा, शास्त्रज्ञ 'ब' पदाच्या १ जागा आणि समावेशी शिक्षण जिल्हा पर्यवेक्षकाच्या ३ पदांची भरती करण्यात येणार आहे. हेही वाचा - संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

UPSC
Army Job : भारतीय सैन्यात दाखल होण्याची मोठी संधी; लाखो रुपये मिळणार पगार

पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार खाली दिलेल्या अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.

अर्जाची फी भरावी लागेल

भरती मोहिमेसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. या मोहिमेसाठी उमेदवारांना २५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. उमेदवार SBI च्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून किंवा व्हिसा/मास्टर क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून पेमेंट करू शकतात. अर्ज करणाऱ्या SC/ST/PWBD/महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क ठेवण्यात आलेले नाही.

UPSC
AIIMS Job : एम्समध्ये भरती; ७० हजारांपर्यंत मिळणार पगार; मुलाखतींसाठी दोनच दिवस शिल्लक

निवड कशी होईल

मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यामध्ये, १०० गुणांपैकी, उमेदवाराला UR/EWS-50 गुण, OBC-45 गुण, SC/ST/PwBD-40 गुण प्राप्त करावे लागतील.

अर्ज कसा करायचा

  • भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार प्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in वर जा.

  • त्यानंतर उमेदवार निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

  • नंतर तुमचा तपशील प्रविष्ट करा आणि फॉर्म सबमिट करा.

  • त्यानंतर उमेदवाराचा फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.

  • आता फी भरा आणि सबमिट करा.

  • त्यानंतर फॉर्म डाउनलोड करा. फॉर्मची प्रिंट आउट घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.