DOT Recruitment 2024: दुरसंचार मंत्रालयात नोकरीची सुवर्ण संधी, 'या' पदासाठी भरती सुरू

DOT Recruitment 2024: मंत्रालयाने 'NCCS रिसर्च असोसिएट स्कीम' अंतर्गत रिसर्च असोसिएटच्या पदांसाठी भरती सुरू आहेत. या पदांशी संबंधित पात्रता असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट dot.gov.in द्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात.
DOT Recruitment 2024
DOT Recruitment 2024Sakal
Updated on

DOT Recruitment 2024: दुरसंचार मंत्रालयामध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरी नोकरीची ही एक उत्तम संधी आहे. मंत्रालयाने 'NCCS रिसर्च असोसिएट स्कीम' अंतर्गत रिसर्च असोसिएटच्या पदांसाठी भरती सुरू आहेत. या पदांशी संबंधित पात्रता असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट dot.gov.in द्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

दूरसंचार मंत्रालयाच्या या भरतीद्वारे, रिसर्च असोसिएटची पदे पुनर्स्थापित केली जातील. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार 17 जून किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. तुम्हाला या पदासाठी अरेज करायचा असेल तर पुढील नियम आणि अटी लक्षात ठेवल्या पाहिजे.

वयोमर्यादा

दूरसंचार मंत्रालयाच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा पुढील प्रमाणे

पदवीधर उमेदवारांसाठी 28 वर्षे

पदव्युत्तर उमेदवारांसाठी 30 वर्षे

पीएचडी उमेदवारांसाठी 35 वर्षे

पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/टेलिकॉम/माहिती तंत्रज्ञान/संगणक/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (इलेक्ट्रॉनिक्स) मध्ये पदवी असणे आवश्यक आहे.

वेतन

या पदांसाठी निवडल्या गेलेल्या कोणत्याही उमेदवाराला दरमहा ७५,००० रुपये वेतन दिले जाईल. निवडलेल्या उमेदवारांना समितीने स्वीकारल्याप्रमाणे अतिरिक्त लाभ आणि भत्ते देखील मिळतील.

अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करू शकता

DOT भरती 2024 साठी अर्ज करण्यासाठी लिंक

अर्ज कसा करावा

दूरसंचार मंत्रालयात या पदांसाठी जे अर्ज करत आहेत त्यांनी अर्ज डाउनलोड करावा आणि संबंधित कागदपत्रांसह ADET (AC & HQ), कक्ष 301, राष्ट्रीय संचार सुरक्षा केंद्र, 2रा मजला, येथे सबमिट करावा. सिटी टेलिफोन एक्सचेंज, संपंगीराम नगर, बंगलोर - 560027येथे पाठवावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.