डिजिटल स्किल : डिजिटल फॅशन टेक्नॉलॉजी

डिजिटल फॅशन टेक्नॉलॉजी हे क्षेत्र व्हर्च्युअल थ्रीडी परिधान कपड्यांसदर्भात आहे. मानव आणि ‘डिजिटल अवतार’ दोघांनाही लक्षात घेऊन ते डिझाइन केलेले आहे.
Digital Fashion Technology
Digital Fashion TechnologySakal
Updated on
Summary

डिजिटल फॅशन टेक्नॉलॉजी हे क्षेत्र व्हर्च्युअल थ्रीडी परिधान कपड्यांसदर्भात आहे. मानव आणि ‘डिजिटल अवतार’ दोघांनाही लक्षात घेऊन ते डिझाइन केलेले आहे.

डिजिटल फॅशन टेक्नॉलॉजी हे क्षेत्र व्हर्च्युअल थ्रीडी परिधान कपड्यांसदर्भात आहे. मानव आणि ‘डिजिटल अवतार’ दोघांनाही लक्षात घेऊन ते डिझाइन केलेले आहे. फॅब्रिक आणि कापड वापरण्याऐवजी विविध थ्रीडी संगणक प्रोग्रॅम-सॉफ्टवेअरसह डिजिटल परिधान कपडे तयार केले जातात. या क्षेत्रात डिजिटल फॅशन डिझाईन, डिजिटल परिधान उपकरणे, डिजिटल क्लोज टेक्चर डिझाईन, डिजिटल अवतार ब्रँडिंग-मॉडेलिंग, डिजिटल गारमेंट्स प्रमोशन, डिजिटल ड्रेसिंग आदी अनेक उपक्षेत्रांचा समावेश होतो.

‘एनएफटी’ म्हणजेच नॉन-फंगीबल टोकन हे प्रोफाइल पिक्चरच्या दिवसांपासून विकसित झाले आहेत. फॅशन जगतात, डिझायनर डिजिटल कपडे हे फोटोशॉप केले जाऊ शकतात आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रमोशन व आवडींसाठी ‘परिधान’ केलेही जाऊ शकतात. फॅशन ‘एनएफटी’ हे अनेक रूपे घेऊ शकतात, ज्यामध्ये ग्राहक आभासी वातावरणात परिधान करू शकतील असे आभासी कपडे, डिजिटल संवाद साधू शकतील अशी डिजिटल सामग्री आणि भौतिक निर्मितीचे साधन आदींचा समावेश होतो. अनेक वेळा डिजिटल ट्विन्स बरोबरही या कौशल्यांचा वापर होतो.

डिजिटल फॅशन टेक्नॉलॉजी ही डिस्पोजेबल संस्कृतीला शाश्वत पर्याय देते. गारमेंट्स भौतिक स्वरूपात नसून केवळ डिजिटल स्पेस किंवा मेटाव्हर्समध्ये अस्तित्वात असू शकतात. हा दृष्टिकोन बहुतांश वेळा कचरा टाळतो आणि ग्राहकांना पर्यावरणाला हानी न पोहोचवता नवीनतम ट्रेंडमध्ये गुंतण्याची संधीही देतो. मेटाव्हर्स हा ज्या भौतिक जगामध्ये आपण आपल्या स्वत-ची वंश, लिंग किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमीसह स्वत-ची ओळख ठरवू शकतो. भौतिक जगाच्या मर्यादेच्या बाहेर आत्म-अभिव्यक्ती संवर्धित करून आभासी वास्तविकता सारख्या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी या डिजिटल फॅशन या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेता येतो. अमर्याद सर्जनशील स्वातंत्र्यासह स्वत: ला व्यक्त करण्याची क्षमता एखाद्या व्यक्तीच्या ओळखीच्या खऱ्या अभिव्यक्तीसाठी हे तंत्रज्ञान अनेक सक्षम पर्याय देते.

एनएफटी परिधान कपडे, हुडीज आणि अॅक्सेसरीजवर डिजिटल फॅशन तंत्रज्ञानाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. पारंपारिक वस्त्र उत्पादनाच्या सापेक्ष, डिजिटल फॅशन ही स्वस्त आणि प्रभावी आहे आणि विशेष म्हणजे, हे उत्पादन मर्यादांवर मात करून सर्वाधिक परिणाम देते. डिजिटल मॉडेलिंग फॅशनचे खरे बलस्थान हे आपण वास्तविक जीवनात आहोत तसे ऑनलाइन असण्याची गरज नसून ही आपल्याला व्हायचे आहे ते मॉडेल होऊ शकतो.

सर्वोत्तम फॅशन डिझायनिंग सॉफ्टवेअरमध्ये पिक्सिओ, कॅनव्हा, विस्मे, ब्राऊझवेअर, क्लोथ्रीडी फॅशन व अन्य अनेक सॉफ्टवेअरचा समावेश आहे. ही सॉफ्टवेअर्स वापरकर्त्यांना विशिष्ट डिझाइन फंक्शन्ससाठी कॉलआउटसह टुडी आणि थ्रीडी स्केचेस, चित्रे आणि टेक पॅक तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देतात ही कौशल्ये आत्मसात केल्याने विविध प्रकारच्या संधी उपलब्ध होत आहेत. डिजिटल ड्रेसिंग हे सुद्धा व्यवसाय मॉडेलमध्ये तयार केले गेलेले आहे. डिजिटल कपडे खरेदी करतात ते प्लॅटफॉर्मवर एक फोटो अपलोड करू शकतात जेणेकरून स्वत-ला त्यांच्या नवीन लूकमध्ये डिजिटल पोशाख दिसण्याचे पर्याय उपलब्ध होतात.

मॉर्गन स्टॅन्लेच्या अंदाजानुसार डिजिटल फॅशन मार्केटची किंमत २०३० पर्यंत ५० अब्ज डॉलरपेक्षा अधिक असू शकते अशा या विकसनशील क्षेत्रात यामुळेच अनेक करिअर संधी उपलब्ध होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.