हेल्थ केअर : डिजिटल मेडिसिनमधील करिअरच्या संधी

कोव्हिडनंतरच्या डिजिटल युगात आपण प्रवेश करत आहोत. मागील दोन वर्षांपासून हे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे.
हेल्थ केअर : डिजिटल मेडिसिनमधील करिअरच्या संधी
Updated on
Summary

कोव्हिडनंतरच्या डिजिटल युगात आपण प्रवेश करत आहोत. मागील दोन वर्षांपासून हे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे.

कोव्हिडनंतरच्या डिजिटल युगात आपण प्रवेश करत आहोत. मागील दोन वर्षांपासून हे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे, की आपल्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाची खूप मोठी भूमिका आहे आणि येणाऱ्या भविष्यातही निर्विवादपणे राहील. तंत्रज्ञान, विशेषत: आरोग्य सेवेमध्ये अतिशय वेगाने प्रगती करत आहे. जगातील अनेक देशातील सामाजिक संघटनांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे, की ८५% आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ हे मान्य करतात की तंत्रज्ञान हा मानवी आरोग्याचा अविभाज्य भाग होईल. विविध प्रकारातील रुग्णांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अपेक्षा तत्परता आणि पारदर्शकतेकडे झुकत राहिल्यामुळे आरोग्याचा प्रश्न आल्यास डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानाची मागणी वाढत आहे.

बिग डेटाच्या दिशेने...

डिजिटल मेडिसिन म्हणजे आरोग्य सेवेसह डिजिटल तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण आणि लोकांच्या वैयक्तिक आरोग्याची कार्यक्षमता. डिजिटल मेडिसिन तंत्रज्ञानामध्ये इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदी, वापरण्यायोग्य उपकरणे, कॉम्पुटर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, टेलिमेडिसीन आणि बरेच काही समाविष्ट आहे. याच क्षेत्रात लाखो युवकांना नोकरीच्या आणि उद्योगाच्या संधी उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वांत जास्त संधी तंत्रज्ञानाची सेवा उद्योगाला जोड देण्याऱ्या क्षेत्रात निर्माण होत आहेत. आयबीएम या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीच्या सीईओंच्या माहितीनुसार, २०२०मध्ये आरोग्यविषयक माहिती प्रत्येक ७३ दिवसांनी दुप्पट होत आहे. अशा प्रकारे प्रचंड प्रमाणात डेटा (माहिती) संकलित केली जात असून, या क्षेत्राला ‘बिग डेटा’ असेही नाव दिले आहे. अशा प्रकारची कोट्यवधी लोकांची माहिती संकलित करून तिचे वर्गीकरण करणाऱ्या नवीन क्षेत्राचा उगम होत आहे, यालाच क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणतात. डिजिटल मेडिसिन क्षेत्रात याच क्लाऊड कॉम्प्युटिंगचा सर्वांत जास्त वापर होणार असून, संधीसुद्धा वाढणार आहेत. सध्या लहान बाळासारखे रांगत असणारे हे क्षेत्र काही वर्षांत चौफेर उधळणार आहे. लोकांच्या आरोग्याचा असणारा डेटा आणि त्या डेटाद्वारे तयार केलेला डेटा संच पारंपरिक प्रणालींमध्ये संग्रहित, विश्लेषण किंवा प्रक्रिया करण्यासाठी खूप मोठा असणार आहे. कॉम्पुटर अभियंते, संख्याशास्त्रातील पदवीधर, तसेच अकाउंट आणि कॉमर्स क्षेत्रातील पदवीधर यांनासुद्धा या क्षेत्रात अगणित संधी उपलब्ध होणार आहेत.

डिजिटल मेडिसिनमध्ये लोकांच्या आरोग्याची जमा केलेली माहिती सध्या वापरात असलेल्या वापरकर्ता-आधारित संगणक संचयन प्रणालीऐवजी नवीन उदयास येत असलेल्या क्लाऊड कॉम्प्युटिंग इंटरनेट-आधारित सर्व्हरचे नेटवर्क वापरून दूरस्थपणे संग्रहित केली जाईल आणि याच माहितीवर प्रक्रियाही केली जाईल. अशा प्रकारचे क्लाऊड-आधारित डिजिटल मेडिसिन तंत्रज्ञान आरोग्य सेवा सुधारून आणि रुग्णांना किफायतशीर आणि सोईस्कर उपाय प्रदान करेल. मागील अनेक वर्षांमध्ये या डिजिटल मेडिसिन उद्योगाने परिस्थितीशी जुळवून घेण्याची गती संथ असली, तरी कोविडनंतरच्या बदललेल्या जगात आपल्याला याचे वेगवान बदलेले स्वरूप दिसून येईल. औषधे आणि हेल्थ उपकरणे तयार करणारी जगातील आघाडीची कंपनी नोव्हार्टिस, या कंपनीने जगातील पहिला डिजिटल मेडिसिनचा प्रयोग सुरू केला असून, याच क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी त्यांनी सहा महिने ते दोन वर्षांचा अभ्यासक्रम युरोपियन आणि अमेरिकन विद्यापीठांमध्ये सुरू केला आहे. येणाऱ्या काही दिवसांत अशाच प्रकारचे अनेक अभ्यासक्रम भारतातही सुरू होतील, यात काही शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()