हेल्थ केअर : संख्याशास्त्रात संधी

संख्याशास्त्र हा गणित विषयापेक्षा अगदी वेगळा विषय आहे. गणितीय तर्कावरच या विषयाची मांडणी असली तरी अनेक मूलभूत संकल्पना या विषयाला गणितापेक्षा वेगळा करतात.
Health Care
Health CareSakal
Updated on
Summary

संख्याशास्त्र हा गणित विषयापेक्षा अगदी वेगळा विषय आहे. गणितीय तर्कावरच या विषयाची मांडणी असली तरी अनेक मूलभूत संकल्पना या विषयाला गणितापेक्षा वेगळा करतात.

मागील आठवड्यातील लेखामध्ये आपण संख्याशास्त्र विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडिकल क्षेत्रात कोणत्या संधी आहेत याबद्दल वाचले असेल. या लेखामध्ये या क्षेत्रातील भविष्यातील संधी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नक्की काय तयारी करायला हवी याबद्दल माहिती घेऊ.

संख्याशास्त्र हा गणित विषयापेक्षा अगदी वेगळा विषय आहे. गणितीय तर्कावरच या विषयाची मांडणी असली तरी अनेक मूलभूत संकल्पना या विषयाला गणितापेक्षा वेगळा करतात. या विषयामध्ये करिअर करायचे असल्यास काही गणितीय संकल्पना समजून घेण्याची गरज असते. मेडिकल क्षेत्रात गणितापेक्षा या विषयातील कुशल विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे या विषयामध्ये अंतर्भूत असणारे संगणकीय भाषा कौशल्ये. विद्यार्थ्यांनी फक्त मूलभूत विषय न शिकता त्या जोडीला अनेक प्रकारच्या संगणकीय भाषासुद्धा शिकण्याची गरज आहे. लोकांच्या, मोठमोठ्या हॉस्पिटल्स, औषध आणि लस निर्माण करणाऱ्या कंपन्या यांच्या आवश्यकता पाहिल्यास नवनवीन संगणकीय भाषा कौशल्ये असणाऱ्यांची खूप गरज आहे.

साधारणपणे या क्षेत्रामध्ये मशिन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप वापर होताना दिसून येतो. यासाठी ‘आर, पायथॉन, पाय स्पार्क, स्पार्कआर’ या संगणकीय भाषा किंवा सॉफ्टवेअर्स यांची आवश्यकता आहे. संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी या कौशल्यांची आवश्यकता आहे. याच्याच जोडीला SAS या संख्याशास्त्र आधारित तंत्रज्ञानाचीही आवश्यकता आहे. लस किंवा औषधाच्या क्लिनिकल चाचण्यांसाठी संख्याशास्त्रीय मॉडेल्स वापरतात आणि त्यासाठी SQL आणि CQL या कौशल्यांची गरज लागते. विद्यार्थ्यांनी या संगणकीय कौशल्यांची माहिती घेऊन त्याचे अतिरिक्त अभ्यासक्रम पूर्ण केले पाहिजेत.

याचबरोबर अनेक औषध आणि लस निर्माण करणाऱ्या कंपन्या, गूगल, ॲमेझॉन सारख्या तंत्रज्ञान कंपन्याही मेडिकल क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी स्वतःच्या अशा संगणकीय भाषा संशोधित करत आहेत. विद्यार्थ्यांनी या नवीन घडामोडींवर लक्ष ठेवून त्यामधील नवीन कौशल्य आत्मसात करावे.

कौशल्याधारित अभ्यासक्रम

जगभरातील अनेक विद्यापीठांनी आणि कंपन्यांनीही या क्षेत्रातील संधी ओळखून त्यामधील नवनवीन कौशल्य आधारित अभ्यासक्रमांना सुरवात केली आहे. उदाहरणार्थ आयर्लंड या फक्त ६० लाख लोकसंख्या असणाऱ्या देशात २० विद्यापीठे आणि सर्वच औषधनिर्माण आणि मेडिकल क्षेत्रातील कंपन्या यांची कार्यालये आणि उत्पादन प्रकल्प आहेत. या देशातील सर्वच विद्यापीठांनी या क्षेत्रातील अभ्यासक्रम तयार करताना विद्यार्थ्यांना नवीन कौशल्यांचा अनुभव मिळावा म्हणून सहा महिने ते एक वर्षाचा थेट औषधनिर्माण आणि मेडिकल क्षेत्रातील कंपनीमध्ये इंटर्नशिप सक्तीची केली आहे आणि यासाठी त्यांनी या कंपन्यांबरोबर करार केले आहेत. याचा फायदा संख्याशास्त्र आणि गणित या दोन्ही विषयात पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे.

अशाच प्रकारचे मॉडेल भारतीय विद्यापीठांनी अवलंबिल्यास हजारो विद्यार्थ्यांना फायदा होईल. भारतात हजारो औषधनिर्माण कंपन्या असून तिथे नवीन प्रकारच्या कौशल्यांची आणि गणितीय आणि संख्याशास्त्रीय तंत्रज्ञानाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून घेतल्यास मूलभूत विज्ञानात पदवी घेऊनही संख्याशास्त्रातील विद्यार्थीही डॉक्टर इंजिनिअरसारखे करिअर करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.