हेल्थ केअर : वेअरेबल इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान

वेअरेबल (घालण्यायोग्य) इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान ही नावीन्यपूर्ण संकल्पना सध्या आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी ठरू पाहत आहे.
wearable electronic technology
wearable electronic technologySakal
Updated on
Summary

वेअरेबल (घालण्यायोग्य) इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान ही नावीन्यपूर्ण संकल्पना सध्या आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी ठरू पाहत आहे.

वेअरेबल (घालण्यायोग्य) इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान ही नावीन्यपूर्ण संकल्पना सध्या आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी ठरू पाहत आहे. कोरोनापूर्वीच्या जगात म्हणजेच गेल्या दहा वर्षात डिजिटल वेलनेस या संकल्पनेचा उगम झाला होता. कोरोनानंतरच्या जगात मात्र ही संकल्पना प्रत्यक्षात उतरताना दिसून येईल आणि ती लाखो नवीन रोजगारही निर्माण करेल. या संकल्पनेचे मूळ हे शरीरातील अनेक क्रियांचे प्रत्यक्ष म्हणजेच रिअल टाइममध्ये माहिती गोळा करू करून, क्षणक्षणाला त्याची माहिती डॉक्टर किंवा प्रत्यक्ष व्यक्तीला दिली जाणार. आपल्या शरीरामध्ये लाखो प्रकारच्या रासायनिक आणि भौतिक क्रिया सुरू असतात. यामध्ये थोडा बिघाड झाला तर या क्रिया एखाद्या रोगामध्ये बदलतात. वेअरेबल ही छोटी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत, ती आपल्या शरीरावर किंवा शरीरातील एखाद्या अवयवात (उदाहरणार्थ त्वचेमध्ये) ठेवल्यावर तापमान, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन, श्वासोच्छवासाचा वेग, आवाज, आपण जिथे आहोत तेथील जीपीएस स्थान, उंची, शारीरिक हालचाल, दिशेने बदल आणि हृदय, स्नायू यांची विद्युत क्रिया मोजण्यात मदत करू शकतात. याचबरोबर ही छोटी यंत्रे मेंदूमधील क्रियाही मॉनिटर करू शकतील.

अशा प्रकारे छोटा यंत्रणेकडून मिळालेली समृद्ध माहिती दर मिनिटांनी आपल्याला समजू शकेल. यामध्ये कॅलरी खर्च, दररोजचा व्यायाम, वेळोवेळी येणारा तणाव आणि त्यामुळे खराब होणारी झोप, एखाद्या विषाणूचा किंवा जिवाणूंचा होणारा संसर्ग आणि पित्तामुळे होणारी जळजळ, अशाप्रकारच्या अनेक शारीरिक क्रियांचा समावेश होईल. अशी माहिती वेळेत मिळाल्यामुळे एखादा आजार होण्याच्या पूर्व चेतावणी चिन्हांचा मागोवा घेण्यास मदत होऊ शकते. याचा सर्वांत मोठा फायदा हा असेल की आपल्याला प्रत्येकवेळी क्लिनिकमध्ये किंवा रुग्णालयात जायची गरज लागणार नाही. दीर्घकालीन आरोग्य स्थितीचे नियोजन करणे आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या महाग असते.

कोरोनाच्या उद्रेकानंतर, संसर्गजन्य किंवा इतर रोगांना प्रतिसाद म्हणून, आरोग्य क्षेत्रातील उपकरण निर्माण करणाऱ्या कंपन्या आणि सेवा देणाऱ्या कंपन्या इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीला प्रोत्साहन देऊन नवनवीन आणि बहुपयोगी तंत्रज्ञान बाजारात घेऊन येत आहेत. वेअरेबल इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान हे त्यापैकीच एक आहे. हे तंत्रज्ञान रुग्णांना किंवा निरोगी व्यक्तींनाही घरच्या घरी प्रतिबंधात्मक काळजी घेण्यासाठी किंवा रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी, तसेच एखादा रोग होण्यापूर्वी वेळेवर हस्तक्षेप करण्यासाठी मदत करू शकते. हे तंत्रज्ञान रुग्णांना स्वत:ची काळजी आणि आरोग्य परिसंस्थेमध्ये अधिक चांगल्या प्रकारे गुंतण्यासाठी सक्षम बनवू शकतात.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे तंत्रज्ञान वय, लिंग आणि वांशिकतेची याची पर्वा न करता मोठ्या समूहातील सर्व लोकांच्या एकूण आरोग्यावर आणि कल्याणावर महत्त्वपूर्ण परिणाम करू शकते. याचबरोबर एकाच भूभागात राहणाऱ्या वेगवेगळ्या वांशिक, सामाजिक-आर्थिक परिस्थितीच्या लोकांच्या आरोग्यासाठी परिणामकारक ठरू शकते. कमी-उत्पन्न समुदायातील व्यक्ती, दीर्घकाळ आजारी, आणि वृद्ध अशा अनेक समुदायांपैकी जे लोक आहेत ज्यांना सहसा दुर्लक्ष केले जाते, ज्याचे दुःखद परिणाम आपण कोरोनाच्या लाटेत पहिले आहेत. अशा लोकांना योग्य उपचार आणि निरोगी आरोग्य मिळण्यासाठी भविष्यात वेअरेबल इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान एक मोठे वरदान ठरेल यात काही शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()