वेगळ्या वाटा : पारंपारिक वाटा छेदणारे लिबरल आर्ट्स

पाश्चिमात्य देशाला मागील काही वर्षात आपल्या पारंपारिक शिक्षण पद्धतीची भुरळ पडली, मात्र यांचे अनुकरण करण्याच्या नादात आपण आपली मुळे विसरलो.
liberal arts education
liberal arts educationsakal
Updated on

- डॉ. प्रीती जोशी

आजच्या शिक्षण पद्धतीत अभ्यासक्रम हे विज्ञान, वाणिज्य व कला या तीन शाखांपुरतेच मर्यादित असल्याने एखाद्या विद्यार्थाला विज्ञान शाखेतील काही विषय आणि कला शाखेतील काही विषय शिकायचे असल्यास ते शिकणे शक्य नसायचे. लिबरल आर्ट्स या स्वतंत्र शाखेद्वारे ही संधी विद्यार्थांना उपलब्ध झाली आहे. हा विषय जागतिक पातळीवर चर्चेत आला असला, तरीही आपल्या देशात पहिल्यापासूनच ही शिक्षणपद्धती रूढ आहे.

गुरुकुल पद्धती हा याचाच एक भाग म्हणता येईल. आपल्याकडे ६४ विद्या आणि १४ कला आधीपासूनच होत्या. गुरुकुल पद्धतीत प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या विषयासोबतच भविष्यात एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्याच्या दृष्टीने लौकिकार्थाने शिक्षण दिले जात असे.

पाश्चिमात्य देशाला मागील काही वर्षात आपल्या पारंपारिक शिक्षण पद्धतीची भुरळ पडली, मात्र यांचे अनुकरण करण्याच्या नादात आपण आपली मुळे विसरलो. कौशल्याधारित शिक्षणाकडे वळत असताना आवडीच्या विषयांचे शिक्षण घेण्याच्या दृष्टीने लिबरल आर्ट्स हा सर्वोत्तम पर्याय म्हणून पुढे येत आहे. विज्ञान, कला, वाणिज्य या शाखांमधील विषयांचे आवडीनुसार एकत्रीकरण करीत त्याद्वारे आपण विकास करू शकणार आहोत. विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे, याबरोबरच त्यांना कसे शिक्षण दिले पाहिजे, काय शिकवलं गेलं पाहिजे यावर यामध्ये भर दिला जातो.

एखाद्या विद्यार्थ्याला सायकॉलॉजी विषयामध्ये बी.ए.पदवी घ्यायची असल्यास पारंपारिक शिक्षणात विषय त्याच्या आवडीचे असो वा नसोत पहिल्या वर्षांला त्याला ४ विषय घ्यावेच लागतात. पुढच्या वर्षी २ विषय घेतले जातात आणि शेवटच्या वर्षी विद्यार्थ्याला स्पेशलायझेशन करायला मिळते अशी पद्धत आहे. मात्र लिबरल आर्ट्समध्ये सायकॉलॉजी हा प्रमुख विषय घेताना त्या विषयाला उपयुक्त असे फाउंडेशन कोर्सेस, रिसर्च कॉम्पोनंट तुम्हाला दिले जातात. त्यासोबत म्युझिक थेरपी, डान्स थेरपी, मेडिटेशन, योगा, ग्रॅफोलॉजी हे इतर महत्त्वाचे विषय देखील शिकता हेच याचे वैशिष्ट्य आहे.

लिबरल आर्ट्समध्ये मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे विषय शिकता येतात. त्याचे रूपांतर करिअरमध्ये करता येणे शक्य आहे. जगातील काही प्रमुख विद्यापीठांमध्ये विद्यार्थी अभियांत्रिकी-एमबीएचे शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी लिबरल आर्ट्सचे शिक्षण ३३ टक्के इतक्या प्रमाणात अनिवार्य केले आहे. विद्यार्थी नव्हे तर चांगला टीम लीडर, व्यवस्थापक, सहकारी घडण्यावर या शिक्षणामध्ये भर दिला गेला आहे. या क्षेत्रातील रोजगाराच्या संधींचा विचार केल्यास या शैक्षणिक पात्रतेने तुम्हाला एका विषयातील नव्हे तर एकापेक्षा जास्त विषयातील अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. नवीन शैक्षणिक धोरणातही लिबरल आर्ट्सचा हा धागा पकडत शिक्षण देण्यावर भर दिला आहे.

(लेखिका एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, कोथरूडमधील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सच्या प्रमुख आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.