नोकरी-बाजारपेठ : वाहन उद्योग क्षेत्र आणि मनुष्यबळ

संचालित, विद्युत आणि स्वचलित मोबिलिटीमधील नवनवीन तंत्रज्ञानाचा उदय आणि अभिसरण यामुळे वाहन उद्योगामध्ये आमूलाग्र बदल दिसून येत आहे.
business
businesssakal
Updated on

इलेक्ट्रिक मोबिलिटीमुळे वाहन उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्पादन आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी अधिकाधिक वापर करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळे वाहन उद्योग क्षेत्रात अनेक नवीन संधी निर्माण होत आहेत. त्यासोबतच नवनवीन कौशल्य असणाऱ्या लोकांची गरजही भासणार आहे.

संचालित, विद्युत आणि स्वचलित मोबिलिटीमधील नवनवीन तंत्रज्ञानाचा उदय आणि अभिसरण यामुळे वाहन उद्योगामध्ये आमूलाग्र बदल दिसून येत आहे. अशा काळात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मूळ वाहन निर्मात्यांना अत्युच्च कौशल्यधारक, प्रतिभासंपन्न गुणवत्तेचा शोध घेणे महत्त्वाचे बनले आहे.

अशा कर्मचाऱ्यांना आपल्याकडे कामावर घेणे आणि टिकवणे यासाठी नवनव्या मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. वेगवेगळ्या समूहाचे एकत्र कार्यकौशल्य आणि अनेक उद्दिष्टांवर एकाच वेळी काम करण्याची क्षमता असणाऱ्या मल्टीटास्किंग मनुष्यबळाची आज कंपन्यांना गरज आहे.

सहचरी गतिशीलतेमध्ये आम्हाला आमच्या विकासाला गती देणाऱ्या, उद्योगांना लाभ देणाऱ्या शाश्वत अशा गतिशीलतेवर आधारित नवनवी साधने प्रचलित करण्यासाठी उपयुक्त कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कामावर घेण्याची गरज आहे.

नविन कर्मचारी तसेच मधल्या फळीतील प्रशासकीय काम पाहणाऱ्या जागांसाठी आम्ही नेहमीच नविन तंत्रज्ञान आणि विचार शिकण्यास उत्सुक, प्रश्न, समस्या सोडविण्याचे स्कील असणारे, विश्लेषणात्मक पात्रता असणारे, कठीण, गुंतागुंतीच्या परिस्थितीतून बाहेर काढू शकणारे, मार्गदर्शक व लीडर शोधत असतो.

नविन कल्पना, तंत्रज्ञान शिकण्याची, जुने कालबाह्य विसरण्याची आणि नव्याशी घडी बसविण्याची क्षमता असणारे कर्मचारी या क्षेत्राची सध्याची गरज आहे. आमच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराचा उत्पादन, आरेखन आणि विकसन या क्षेत्रातील पाया मजबूत आहे का, हेही आवर्जून पाहतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तशा पद्धतीने आपली स्कील वाढवावीत.

इलेक्ट्रिक मोबिलिटी, स्वयंचलित आणि संचालित वाहन तंत्रज्ञान यांचे अभिसरण हा एक लक्षवेधी बदल सध्या होत आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, रोबोटिक्स या सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची आता या उद्योगाला आवश्यकता भासणार आहे.‌ त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना विचार करावा.

‘स्टार्टअप’साठी आकर्षक क्षेत्र

इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्राकडे नवनवीन कल्पना व तंत्रज्ञान घेऊन नवनवे उद्योजक व स्टार्टअप उद्योग आकर्षित होत आहेत. तुम्हाला ईव्ही क्षेत्राचे आकर्षण असेल तर तुम्हाला स्वतःचा स्टार्टअप उद्योग सुरू करण्याची किंवा वेगाने वृद्धिंगत होणाऱ्या एखाद्या स्टार्टअप उद्योगात सामील होता येईल. एकंदरच ईव्ही क्षेत्राच्या भरभराटीसाठी आपले योगदान देता येते. इलेक्ट्रिक मोबिलिटी हा उद्योग अत्यंत वेगाने प्रगती करणारा उद्योग आहे.

तंत्रज्ञान आणि बाजारशक्तीतील बदलांबरोबर येथे नवनवे बदल/ कल उदयास येतात. या क्षेत्रात करिअर घडविणे किंवा उद्योग व्यापार करणे यात तुम्हाला रस असेल तर या क्षेत्रातील अद्ययावत घडामोडींची माहिती आत्मसात करणे आणि या बदलांना आवश्यक असणारी संबंधित कौशल्ये सतत मिळवणे हीच या क्षेत्रातील संधींचा फायदा घेण्याची गुरूकिल्ली आहे.

(लेखक पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ईकेए मोबिलिटी कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.