विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी नुसार व क्षमता लक्षात घेऊन अनेक पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रम विविध विद्यापीठांनी तसेच महाविद्यालयांनी चालू केले आहेत. ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकासाला तसेच रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्य गुणांचा विचार केला जातो. याच पार्श्वभूमीवर आपण आज बीबीए या अभ्यासक्रमाविषयी जाणून घेऊयात...
- डॉ. सुमीता जोशी
विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी नुसार व क्षमता लक्षात घेऊन अनेक पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रम विविध विद्यापीठांनी तसेच महाविद्यालयांनी चालू केले आहेत. ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकासाला तसेच रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्य गुणांचा विचार केला जातो. याच पार्श्वभूमीवर आपण आज बीबीए या अभ्यासक्रमाविषयी जाणून घेऊयात...
बारावीची परीक्षा झाली की वेध लागतात ते पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे. वैद्यक, अभियांत्रिकी विविध पदविका अभ्यासक्रम, पारंपरिक अभ्यासक्रम म्हणजेच बी.कॉम., बी. एस्सी., बी.ए. अभ्यासक्रमांची माहिती सामान्यतः विद्यार्थी व पालकांना असते. कारण हे अभ्यासक्रम विविध विद्यापीठांमध्ये गेली अनेक वर्षे राबविले जात आहेत. परंतु या व्यतिरिक्त आज आधुनिक काळाची गरज लक्षात घेवून व्यावसायिक पदवी अभ्यासकम देखील उपलब्ध आहेत. बीबीए म्हणजे Bachelor of Business Administration. हा व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून ओळखला जातो. बी. कॉम या पारंपारिक अभ्यासक्रमाच्या मर्यादित कक्षेमुळे बीबीए हा अभ्यासक्रम काही वर्षांपासून विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे.
विशेष शाखा
बीबीए या अभ्यासक्रमांतर्गत विविध विद्यापीठांनी आजच्या काळाची गरज लक्षात घेता विशेष शाखा चालू केल्या आहेत. जसे की BBA Marketing / HRM / Finance BBA Digital Marketing, BBA International Business; BBA - Global E-Business; BBA - Business Analytics; BBA - Banking Insurance & Finance; BBA Research; BBA Family Business & Entrepreneurship Management; BBA Global Marketing & Event Management इत्यादी.
प्रवेश प्रक्रिया
बीबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) तसेच व्यक्तिगत मुलाखत यामध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. विज्ञान, वाणिज्य तसेच कलाशाखेचे विद्यार्थी BBA ला प्रवेश घेऊ शकतात. CET च्या गुणांसोबतच १२ वीच्या गुणांचाही विचार प्रवेश देताना केला जातो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP) नुसार विद्यार्थी ३ वर्षे पूर्ण करून BBA ही पदवी घेऊ शकतात. एकूण ६ सत्रांचा यामध्ये समावेश असतो. प्रत्येक वर्षी २ सत्रे याप्रमाणे ३ वर्षात ६ सत्रे पूर्ण करणे आणि त्यात उत्तीर्ण होणे आवश्यक असते.
अभ्यासक्रमात काय?
प्रथम वर्षात प्राथमिक स्वरुपातले व्यवस्थापन शास्त्र, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि तंत्रज्ञानाशी आधारित विषयांचा समावेश होतो. दुसऱ्या वर्षापासून (सत्र ३) निवडलेल्या विशेष शाखांमधील विविध विषय तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून शिकविले जातात. त्याचबरोबर उद्योगांना आवश्यक अशा कौशल्यांचा विकास होण्यासाठी तसेच प्रात्यक्षिक अनुभव मिळण्यासाठी विद्यार्थ्याना Internship (इंर्टनशिप) अनिवार्य आहे. तिसऱ्या वर्षांमध्ये म्हणजेच शेवटच्या दोन सत्रांत विद्यार्थ्याला Specialization म्हणून निवडलेल्या विषयाचा एक प्रोजेक्ट पूर्ण करावा लागतो.
उद्योजकतेकडे वाटचाल
काही मोजक्या विद्यापीठांमध्ये Business Simulation चे मार्गदर्शन मिळते. ज्यामुळे विद्याथ्र्यांना प्रत्यक्ष व्यवसायाचे स्वरूप, त्यातील अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची निर्णय क्षमता विकसित केली जाते. त्याचमुळे उद्योजकतेला हातभार लागतो. आजकालची पिढी ही नाविण्य आणि सर्जनशीलता यावर भर देणारी असून, स्वयंरोजगाराच्या संधी शोधते. त्यासाठी Business Simulation चे प्रशिक्षण अत्यावश्यक आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक स्थैर्य आणि शांतीसाठी विद्यापीठांनी व महाविद्यालयांनी योग, ध्यान, आंतरविद्याशाखीय विषय अंतर्भूत केले आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. केवळ पदवी मिळवून देणे हा BBA या अभ्यासक्रमाचा उद्देश नसून भविष्यात यशस्वी उद्योजक व व्यावसायिक घडवणे हा आहे.
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संधी
बीबीए ही पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी देशात आणि परदेशात (MBA, MCA, MS) तसेच स्पर्धात्मक परीक्षेसाठी (MPSC, UPSC) पात्र ठरतो. विद्यार्थ्याला अनुभवासाठी नोकरी करायची असल्यास Banking, Insurance, FMCG, IT, Finance, Advertising Agencies, Consultancy, Business Analytics, Digital Marketing Startups या क्षेत्रांमध्ये संधी नक्कीच उपलब्ध आहेत. या संधी विद्यापीठे Placement Assistance देऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोचवितात. या सर्व बाबींचा विचार केल्यास BBA अभ्यासक्रम १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक नक्कीच सुवर्णसंधी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.