संवाद : करिअर निवड आणि विद्यार्थ्यांची मानसिकता

इयत्ता अकरावीच्या वर्गात एकदा ‘तुमची स्वप्ने काय आहेत? भविष्यात तुम्हाला काय बनायला आवडेल?’ असे प्रश्न विचारले आणि वर्गात शांतता प्रस्थापित झाली.
Students
StudentsSakal
Updated on
Summary

इयत्ता अकरावीच्या वर्गात एकदा ‘तुमची स्वप्ने काय आहेत? भविष्यात तुम्हाला काय बनायला आवडेल?’ असे प्रश्न विचारले आणि वर्गात शांतता प्रस्थापित झाली.

इयत्ता अकरावीच्या वर्गात एकदा ‘तुमची स्वप्ने काय आहेत?  भविष्यात तुम्हाला काय बनायला आवडेल?’ असे प्रश्न विचारले आणि वर्गात शांतता प्रस्थापित झाली. बहुतेक हा प्रश्न त्यांना मनात डोकवायला लावणारा होता. साधारणपणे कनिष्ठ महाविद्यालयातील मुले भविष्याविषयी, करिअर निवडायच्या विषयी  थोड्या गांभीर्याने विचार करू लागतात.  मात्र, शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा विचार करायला  सुरुवात होत नाही.  अर्थात, ही परिस्थिती काही वर्षांपूर्वीची आता शाळा, विद्यार्थी, पालक हे करिअरच्या निवडीबाबत जास्त सजग व्हायला लागले आहेत.

विद्यार्थी स्वयंपूर्ण व्हावेत

दुसऱ्याच्या मनात  शिरून त्याची मानसिकता तपासणे हे एकदम अवघड काम.  त्यातच विद्यार्थ्यांच्या मनात शिरणे हे आव्हानात्मकच.  मुलांच्या मनात काय शिजत असते, याचा पत्ता लागणे अवघडच. त्यांच्याबरोबर दिलखुलास गप्पा मारल्यास, तर ते उलगडतात आपल्या मनातील गुज सांगतात. असे जाणवले, की मुले करिअरच्या बाबतीतील निर्णय घेण्यास अजून स्वयंपूर्ण बनलेली नाहीत. आपले आई-वडील सांगतील त्या दिशेने जाण्याची मुलांची मानसिकता सहज दिसून येते. आपल्या आई-वडिलांचे व्यवसाय किंवा तेच क्षेत्र पुढे घेऊन जाण्याची भूमिका सर्व सामान्य दिसते. काही मंडळी मात्र आपल्या मित्रांसोबत मनमोकळेपणाने गप्पा मारून आपले भविष्य करण्याच्या मागे लागतात. यात दुसऱ्यांच्या बरोबर नकळत तुलना करण्याची वृत्ती जास्त. त्यात प्रामुख्याने प्रवाहाबरोबर वहात जाणाऱ्यांची संख्या जास्त.

वेगळे करण्याची मानसिकता

‘स्व’ची जाणीव विद्यार्थ्यांना या दरम्यान मोठ्या प्रमाणात झाल्याचे मात्र दिसून येते. आपल्याला भविष्यात ते स्वतःला कसे पाहू इच्छितात यासाठी अनेक विद्यार्थी स्वयंप्रेरित झाल्याचे जाणवते. कोणती शाखा निवडावी हे परीक्षेच्या निकालानंतरच ठरवायची गोष्ट असा समज. परंतु त्याबाबतचा विचार मात्र अगदी आठवी-नववीपासून करणे गरजेचा आहे, हे आता काही मुलांना वाटते. त्या विषयाचे मार्गदर्शन शाळेतच मिळावे, अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केली. ते मिळत नाही आणि बऱ्याचदा विद्यार्थी संभ्रमावस्थेत राहतात. ही अवस्था शहरी मुलांची, ग्रामीण विभागातील अवस्था मात्र अजूनही मागेच. माहिती समुपदेशन, मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतच नाही. असे जाणवले, की मुलांची नजर धावत असते आणि आपल्या अवतीभवतीचे व्यवसाय, नोकऱ्या, धंदे ते पाहात असतात. मात्र, एकदम हटके, वेगळे काही करण्याची त्यांची मानसिकता मात्र तयार झालेली नसते. घरच्यांचा प्रभाव, सभोवताली असणारे व्यवसाय, जवळपास राहणारे आपले शेजारी यांच्या क्षेत्राचा निवडीवर ती परिणाम होतो, असे काहींचे मत. बऱ्यापैकी सुरक्षित, पैसेवाला जॉब निवडणे, आपल्यासमोर काही आदर्श ठेऊन करिअरची निवड करणे हे काहीजणांना आवश्यक वाटते.

आपल्याला काय जमणार नाही काय अडचणी येतील, हे विचार घेऊन निर्णय घेतला जातो. प्रवेश परीक्षांमधून येणाऱ्या निर्णयावरतीसुद्धा कोणते करिअर निवडायचे हे अवलंबून ठेवतात. विद्यार्थ्यांची मल्टिटास्किंगची तयारीसुद्धा तुफान असते. ही मानसिकता लक्षात घेता खरेतर कोणतेही करिअर, व्यवसाय, नोकरी कधीही वाईट नसते; आवश्यक असते आपण त्यात किती मन लावून काम करतो याची आणि ‘ए’ प्लॅन यशस्वी झाला नाही तर ‘बी’ तयार ठेवणे आवश्यक. कारण परत मागे फिरून आपण नव्याने विचार करणे शक्य असते, तो दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक असते. अन्यथा, केवळ आपल्या मानसिकतेपोटी आपण आपले भविष्य अधांतरी करून ठेवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.