संवाद : खेळातून अभ्यास घडवा

सतत अभ्यास केल्याने आपले डोळे, मेंदू थकून जातो आणि मग आपल्याला विश्रांतीची गरज भासू लागते. अभ्यासाचा शिणवटा, किंवा ताण तणाव आपल्याला यायला लागतो.
games sports
games sportssakal
Updated on
Summary

सतत अभ्यास केल्याने आपले डोळे, मेंदू थकून जातो आणि मग आपल्याला विश्रांतीची गरज भासू लागते. अभ्यासाचा शिणवटा, किंवा ताण तणाव आपल्याला यायला लागतो.

खेळ आणि अभ्यास याचा काय संबंध? परंतु तुमचा विश्वास बसणार नाही, खेळलात ना तर तुमचा अभ्यासपण छान होईल. तुम्ही म्हणाल अभ्यासपण करा म्हणताय आणि खेळापण म्हणताय. नक्की काय करायच? हो नक्कीच जसा अभ्यासाच्या वेळेस अभ्यास, तसेच खेळायच्या वेळेस खेळ ठेवले म्हणजे झाले. आता वास्तविक पाहता खेळ आणि अभ्यासाचा काय संबंध ते अभ्यासूया म्हणजे पाहूया!

सतत अभ्यास केल्याने आपले डोळे, मेंदू थकून जातो आणि मग आपल्याला विश्रांतीची गरज भासू लागते. अभ्यासाचा शिणवटा, किंवा ताण तणाव आपल्याला यायला लागतो. तेच तेच वाचून डोके गरगरायला लागतं. अशा वेळेस कितीही अभ्यास केला तरी तो अपुराच आहे असे वाटत राहते. तसेच परीक्षेत आयत्या वेळेस उत्तर आठवेल किंवा नाही याची भीती सतत मनात राहते. अभ्यासाचा वेळ खेळात घालवणे म्हणजे आपण वेळ वाया घालवणे आहे अशी आपली समजूत व्हायला लागते. परंतु हे तितकेसे बरोबर नाही.

आपण खेळतो म्हणजे आपला अभ्यासाचा वेळ आपण वाया घालवतो असे समजणे चुकीचे आहे. खरंतर ठराविक काळानंतर अभ्यास करण्याला अर्थात तुम्ही जे वाचत आहात लिहीत आहात त्यातून क्षणभर बाहेर पडणं हे अत्यंत गरजेचं असतं. अभ्यासातून काहीतरी बदल आवश्यक असतो. तुम्ही जे अभ्यासत आहात ते डोक्यामध्ये शिरून नीट संग्रही राहावे, स्मरणात राहावे यासाठी वेळ देणे गरजेचे असते. खेळताना तुम्ही अभ्यासाच्या चक्रामधून बाहेर पडता. कारण अभ्यासातून डोक्याला थोडी विश्रांती देणे आवश्यक असते. खेळताना तुमच्या शरीराला व्यायाम घडत असतो, रक्ताभिसरण सुधारते, जास्तीत जास्त ऑक्‍सिजनचा पुरवठा तुमच्या शरीराला होऊ लागतो. ज्यामुळे तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त उत्साही वाटू लागते. मन ताजेतवाने आणि पुढील अभ्यासासाठी तयार होऊन जाते. अभ्यासासाठी किती वेळ द्यायचा आणि किती वेळ खेळण्यासाठी द्यायचा हे ज्याचे त्याला नीट ठरवावे लागेल. पूर्णतः खेळाकडे दुर्लक्ष करून अभ्यास चांगला होईल असे नाही. खेळून झाल्यानंतर तुम्ही परत एकदा अभ्यास आठवण्याचा प्रयत्न करता यातूनच तुमची स्मरणशक्ती सुधारू शकते.

अभ्यासात जे शिकलात ते खेळताना वापरण्याची एक चांगली संधी असते. उदाहरणार्थ, कार्यकारण भाव, तार्किकता, निर्णय क्षमता, कौशल्यांचा वापर, परस्पर सहकार्य, स्पर्धात्मक वृत्ती, जिज्ञासू वृत्ती, गणिती ज्ञान, शारीरिक शास्त्र, यासारख्या अनेक बाबींचा प्रत्यक्ष उपयोग खेळताना करावा लागतो. अर्थात खेळ आणि अभ्यास याची जोड अगदी नकळत घालावी लागते. क्रीडांगणाची लांबी रुंदी, जमिनीचा पोत, खेळताना बॅटला लावावी लागणारी ताकद, कराव्या लागणाऱ्या हालचाली, बॉलला लावावी लागणारी ताकद आणि दिशा या सर्वांना प्रत्यक्षात आणताना आपला अभ्यास तर कामी येत असतो. एक सिद्ध अनुभव म्हणजे मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी खेळामधील सहभाग हा जास्त फायदेशीर होतो. अभ्यास जरूर करा परंतु खेळण्याचे महत्त्व मात्र विसरू नका. खेळ ही अभ्यासाची दुसरी बाजू आहे हे विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.