दखल : स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरीची संधी

स्टेट बँक ऑफ इंडियाने अप्रेंटिसद्वारे युवक-युवतींना संधी देण्यास सुरुवात केलेली आहे.
State Bank of India
State Bank of Indiaesakal
Updated on

- प्रा. डॉ. विजय कुंभार

स्टेट बँक ऑफ इंडियाने अप्रेंटिसद्वारे युवक-युवतींना संधी देण्यास सुरुवात केलेली आहे. क्लार्क तथा ज्युनियर असोसिएट भरती परीक्षेबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून, एकूण ८२८३ पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी पदवीधर किंवा ३१ डिसेंबर २०२३ अखेर पदवी परीक्षेचा अंतिम निकाल लागणार आहे, असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

वयोमर्यादा

  • १ एप्रिल २०२३ रोजी किमान २० वर्षे व कमाल २८ वर्षे ही वयोमर्यादा आहे. तथापि अनुसूचित जाती व जमातीमधील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे, इतर मागास प्रवर्गाकरिता ३१ वर्षे, तर दिव्यांग उमेदवारांकरिता १० ते १३ वर्षे वयोमर्यादेत शिथिलता दिलेली आहे.

  • सर्वसाधारण माजी सैनिकांसाठी ही वयोमर्यादा त्यांनी प्रत्यक्ष केलेली सेवा अधिक ३ वर्षे अशी निश्चित करण्यात आलेली आहे. दिव्यांग माजी सैनिकांसाठी ही मर्यादा जादा ८ वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेचा पदवीधर

  • किमान १५ वर्षे सेवा झालेल्या सेवानिवृत्त म्हणजेच माजी सैनिकांकडे आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन.

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत - ७ डिसेंबर २०२३

पूर्वपरीक्षा (१०० गुण) - जानेवारी २०२४

मुख्य परीक्षा (२०० गुण) - फेब्रुवारी २०२४

भरती प्रक्रियेचे स्वरूप

  • परीक्षा ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार असून, ती बहुपर्यायी स्वरूपाची असेल.

  • परीक्षेकरिता इंग्रजी व हिंदीबरोबरच मराठी माध्यम उपलब्ध.

  • पूर्वपरीक्षेचे स्वरूप - ही एकूण १०० गुणांची असून, त्यासाठी इंग्रजी भाषा, न्यूमॅरिकल एबिलिटी व रिझनिंग अॅबिलिटी असतील.

  • मुख्य परीक्षेस पात्र होण्याकरिता पूर्वपरीक्षेमधील तिन्ही विषयांत किमान आवश्यक गुण प्राप्त करणे बंधनकारक राहील.

  • मुख्य परीक्षेचे स्वरूप - एकूण ४ सेक्शन असून, ही परीक्षा २०० गुणांची आहे. त्यासाठी २ तास ४० मिनिटे इतका कालावधी असतो. ही परीक्षा बहुपर्यायी व ऑनलाइन असते.

  • अंतिम निवड - मुख्य परीक्षेसाठीच्या २०० गुणांमधील प्राप्त झालेल्या एकूण गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाते. ज्या उमेदवारांनी ३१ ऑक्टोबर २०२३ अखेर स्टेट बँकेत शिकाऊ उमेदवार म्हणून सेवा पूर्ण केलेली आहे, त्यांना मुख्य परीक्षेसाठी एकूण ५ गुण बोनस म्हणून दिले जाणार आहेत.

ऑनलाइन अर्जाची पद्धती

  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर आणि योग्य आकारातील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आवश्यक आहे.

  • ऑनलाइन परीक्षेकरिता सर्वसाधारण प्रवर्ग, इतर मागास वर्ग व आर्थिक मागास प्रवर्गासाठी ७५० रुपये तर अनुसूचित जाती व जमाती, माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारासाठी कोणतेही शुल्क नाही.

  • परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी https://bank.sbi/web/careers/current-openings या संकेतस्थळावर भेट द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.