गणित दिन विशेष : 'या'मुळे पडला गणित, तोंडी आकडेमोड व पाढ्यांचा विसर

गणित दिन विशेष : 'या'मुळे पडला गणित, तोंडी आकडेमोड व पाढ्यांचा विसर
गणित दिन विशेष : 'या'मुळे पडला गणित, तोंडी आकडेमोड व पाढ्यांचा विसर
गणित दिन विशेष : 'या'मुळे पडला गणित, तोंडी आकडेमोड व पाढ्यांचा विसरesakal
Updated on
Summary

कधी काळी पंतोजींच्या शाळेत पावकी, निमकी, दीडकीचे पाठांतर बंधनकारक होते.

सोलापूर : काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ बॅंका (Bank), वित्तीय संस्था (Financial Institution) व मोठ्या उलाढालीचे दुकानदार यांच्याकडेच कॅल्क्‍युलेटर (Calculator) दिसत होते. मात्र मोबाईल फोन (Mobile Phone) प्रत्येकाची गरज बनला आणि मोबाईलमध्ये कॅल्क्‍युलेटर सहज उपलब्ध झाले. यामुळे तोंडी आकडेमोड, पाढे कालबाह्य झाले. या कॅल्क्‍युलेटरचा वापर इतका वाढला आहे की, माणूस गणित (Mathematics) विसरतो की काय, अशी भीती वाटत आहे. (Due to calculator and mobile, people have lost the habit of oral and written mathematics)

गणित दिन विशेष : 'या'मुळे पडला गणित, तोंडी आकडेमोड व पाढ्यांचा विसर
Jio शी जोडले 15 लाखाहून अधिक युजर्स! Airtel व Vodafone Idea ला धक्का

कधी काळी पंतोजींच्या शाळेत पावकी, निमकी, दीडकीचे पाठांतर बंधनकारक होते. नंतर ही पावकी, निमकी, दीडकी उजळणीच्या पुस्तकात केवळ माहितीसाठी राहिली. शालेय अभ्यासक्रमात केवळ पाढे राहिले. नंतर पाढे पाठांतराच्या भीतीने कुणाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, हा विचार पुढे येत पाढे पाठांतरही कालबाह्य ठरले. एकेकाळी तीसपर्यंत पाढे पाठ असणे आवश्‍यक होते. त्यानंतर नऊपर्यंतचे पाढे आले की इतर पाढे तयार करता येतात, ही पळवाट निघाली. मात्र कॅल्क्‍युलेटरचा उगम झाल्यानंतर गुणाकार, भागाकार, मोठ्या बेरीज, वजाबाकी करण्यासाठी कॅल्क्‍युलेटरचा वापर सर्रास होऊ लागला. हा वापर इतका वाढत गेला की, सर्व लहानमोठे व्यापारी व वित्तीय संस्था या कॅल्क्‍युलेटरद्वारे आकडेमोड करत असतात. मात्र, सर्वसामान्यांना हे कॅल्क्‍युलेटर सांभाळणे अशक्‍य असल्याने सामान्य माणूस सर्व आकडेमोड तोंडी अथवा कागदावर करत होता. मात्र, ही स्थितीही मोबईल येइपर्यंतच टिकली.

एकविसाव्या शतकात मोबाईलही सामान्य माणसाची गरज बनला. मोबाईल प्रत्येकाच्या खिशात आला. मोबाईलमध्ये कॅल्क्‍युलेटर सहज उपलब्ध झाले. याचा वापर आज इतका वाढला आहे की, समान्य गुणाकार, भागाकारच काय अगदी बेरीज- वजाबाक्‍याही मोबाईलद्वारेच केल्या जात आहेत. यामुळे गणित करण्याच्या पद्धती, पाढे आणि तोंडी आकडेमोडीचा अक्षरश: विसर पडला आहे.

गणित दिन विशेष : 'या'मुळे पडला गणित, तोंडी आकडेमोड व पाढ्यांचा विसर
SBI देणार आता FD वर जादा परतावा! बॅंकेने वाढवला व्याजदर

नियमित कामासाठी एसटीत मोबाईलद्वारे आकडेमोड करणे शक्‍य होत नाही. शिवाय तोंडी हिशेब कमी वेळेत होतो. मोठ्या रकमेच्या बेरजा, तिकिटांचा हिशेब सादर करणे यासाठी पडताळणीकरिता मोबाईलमधील कॅल्क्‍युलेटरचा आधार घ्यावा लागतो.

- सुचित्रा बिराजदार, एसटी बस वाहक, अकलूज डेपो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()