सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहाणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. आयबीपीएसकडून पीओ पदासाठी बंपर भरती पार पडल्याच्या एक महिन्यातच आणखी एक पीओ भरती सुरू झाली आहे. यावेळी पीओ म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या ४० पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाता आहे. या रिक्त पदांमध्ये १६ पदे ही अनारक्षित आहेत तर ३ ईडब्लूएस, ११ ओबीसी, ०६ एससी आणि ४० एसटी वर्गासाठी आरक्षित आहेत.