जगभरात आज प्रत्येक भारतीयाची ख्याती पोहोचली आहे. जगात असा देश उरला नाही जिथे भारतीय व्यक्तीने त्याचे बस्तान बसविलेले नाही. त्यातही भारतातील मराठी माणसाचा ध्वज आज प्रगत देशात फडकत आहे. प्रत्येक भारतीयाचा आवडता देश म्हणून जर्मनीला पहिली पसंती आहे.
योग्य शिक्षण आणि करिअरच्या संधींमुळे जर्मनी ही भारतीयांची कर्मभूमी बनत आहे. जर्मनी आणि भारत यांच्यातील ऋणानुबंध दृढ करण्यासाठी जर्मनीतील काही संस्था पुढे आल्या आहेत. त्यापैकी एक आहे बाडेन-वुटेम्बर्ग राज्य भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्रीय प्रज्ञावंतांसाठी 'लँड हियर' होय.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
'लँड हियर' या मोहिमेंतर्गत जर्मनी देशाने आपली दारे मराठी लोकांसाठी खुली केली आहेत. नैऋत्य जर्मनीतील बाडेन वुटेम्बर्ग येथील 'द लँड' या प्रकल्पात नोकरी-व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी भारतीय कुशल बुद्धिमत्ता असलेल्या उमेदवारांना चालून आली आहे.
लॅंड हिअर या मोहीमेत जागतिक पातळीवरील सर्वोत्तम कंपन्या येथे कार्यरत आहेत. 'लँड हिअर' या मोहिमेद्वारे अधिकाधिक भारतीयांना, विशेषतः महाराष्ट्रीय नागरिकांना 'द लँड' येथे काम करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
असे हे वैशिष्ट्यपूर्ण बाडेन-वुटेम्बर्ग आता महाराष्ट्रातही 'लँड हिअर' ही मोहीम सुरू करीत आहे. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट भारतीयांना जर्मनीमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यातही बाडेन-वुटेम्बर्गमध्ये कामासाठी प्रोत्साहन वे देणे हे आहे.
या मोहिमेविषयी बोलताना,'द लँड' म्हणजेच बाडेन-वुटेम्बर्गमध्ये आता आयटी, मेटल आणि इलेक्ट्रिकल यांसारख्या क्षेत्रात जवळपास २०,००० भारतीय काम करीत आहेत. या भारतीयांनी येथेही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे मुख्यमंत्री स्टॅगमन म्हणाले.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.