11th Admission : आता उत्पन्नाचा दाखला नसला, तरी अकरावीत मिळणार प्रवेश

ही कागदपत्रे तुमच्याकडे नसतील, तरी आता तुमच्या मुलांना इयत्ता अकरावीत प्रवेश मिळू शकणार
11th Admission
11th Admissionesakal
Updated on

पुणे : तुम्ही मुलांच्या अकरावीच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहात का!, प्रवेशासाठी लागणारा उत्पन्नाचा दाखला किंवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र तुमच्याकडे नसल्याचे आता प्रवेश कसा मिळणार, या चिंतेत तुम्ही आहात का! अहो, मग आता चिंता करू नका. ही कागदपत्रे तुमच्याकडे नसतील, तरी आता तुमच्या मुलांना इयत्ता अकरावीत प्रवेश मिळू शकणार आहे.

होय, आता इयत्ता अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. राज्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावती महापालिकेच्या क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

11th Admission
11th Admission: शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश! १३ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया संपवून १७ जुलैपासून कॉलेज सुरु करा

प्रवेश प्रक्रियेतील पहिली नियमित फेरी नुकतीच पूर्ण झाली असून सध्या दुसऱ्या फेरीतील महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पहिल्या फेरीदरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (नॉन क्रिमी लेअर) नसल्याने महाविद्यालयांकडून प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे समोर आले.

त्यावेळी अखेर प्रवेशाच्या शेवटच्या टप्प्यात शिक्षण विभागाने हालचाल केली आणि अखेर हे प्रमाणपत्र नसले तरीही अर्जाची पोहोच पावती आणि हमीपत्र देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा आणि हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, असे आदेश शिक्षण मंत्रालयाने २२ जून रोजी दिले.

11th Admission
Nashik 11th Admission : अकरावी प्रवेशासाठी आजपर्यंत वाढीव मुदत

परंतु त्यानंतरही महाविद्यालयांनी अन्य कागदपत्राचे कारण दाखवत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार देण्यास सुरवात केली. त्यामुळे आता अखेर शिक्षण मंत्रालयाने पुन्हा एकदा आदेशाचे पत्र काढत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाला कागदपत्रांअभावी विद्यार्थ्यांची अडवणूक करण्यात येऊ नये, यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

त्यामुळे प्रवेशादरम्यान उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याच्या प्रमाणपत्रासह उत्पन्नाचे दाखला नसला तरीही विद्यार्थ्यांकडून पोहोच पावती आणि हमीपत्र घेऊन प्रवेश देण्यात येणार आहे.

11th Admission
11th Admission News : अकरावी प्रवेशासाठी उद्यापर्यंत नोंदणी

आता प्रमाणपत्रे सादरीकरणासाठी तीन महिने मुदत

‘‘शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. उत्पन्नाचे दाखले मिळावेत, यासाठी प्रस्ताव दाखले केले आहेत,

अशा विद्यार्थ्यांकडून हमीपत्र भरून घेऊन आणि नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र नसणाऱ्या विद्यार्थ्यांना पोहोच पावती किंवा हमीपत्र घेऊन संबंधित प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देऊन कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश द्यावा,’’

अशी सूचना शालेय शिक्षण मंत्रालयातील कक्ष अधिकारी विवेक सपकाळ यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाला दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.