Chirekhan School : चिरेखाण शाळेतून 'इतक्या' मुलांना शिक्षणाचे धडे; बाहेरून रोजगारासाठी येणाऱ्या कुटुंबांना दिलासा

शिंदेवाडी येथे सुरू केलेल्या या शाळेमध्ये तब्बल २४ मुले शिकत आहेत.
Chirekhan School Ratnagiri
Chirekhan School Ratnagiriesakal
Updated on
Summary

या शाळेच्या माध्यमातून शिक्षणाचा होणारा श्रीगणेशा परप्रांतीय कुटुंबीयांच्या मुलांचे जीवन प्रकाशमय करण्यामध्ये निश्‍चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

राजापूर : सक्तीचे शिक्षण (Education) कायद्याने अनेकांना शिक्षणाची द्वारे खुली झाली असली तरी कोकणामध्ये रोजगारानिमित्त दाखल होणाऱ्या परप्रांतीय कुटुंबातील शेकडो मुले आजही शैक्षणिक प्रवाहापासून दूर असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळते. रोजगारातून पोटाची खळगी भरण्याला प्राधान्य देणाऱ्या या कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आबासाहेब मराठे महाविद्यालयाने चिरेखाण शाळा सुरू केली आहे.

शिंदेवाडी येथे सुरू केलेल्या या शाळेमध्ये तब्बल २४ मुले शिकत आहेत. या शाळेच्या माध्यमातून शिक्षणाचा होणारा श्रीगणेशा परप्रांतीय कुटुंबीयांच्या मुलांचे जीवन प्रकाशमय करण्यामध्ये निश्‍चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रोजगार मिळविण्यासाठी परराज्यातून विशेषकरून कर्नाटक (Karnataka), बेळगाव, बिहार, उत्तर प्रदेश आदी राज्यांतून कुटुंबे कोकणात येतात. नेपाळमधील गुरखेही मोठ्या संख्येने बागांमधील कामे आणि बोटींवर मासेमारीचे काम मिळवण्यासाठी येतात.

Chirekhan School Ratnagiri
Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

या कुटुंबातील आई-वडील दिवसभर कामाच्या ठिकाणी जातात. अशावेळी छोट्या भावंडांना सांभाळण्यासाठी किंवा कुटुंबातील छोट्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी मोठी मुले पेलतात. सक्तीच्या शिक्षण कायद्यामुळे ही मुले शैक्षणिक प्रवाहात येत असली तरी कुटुंबांच्या अस्थिरतेमुळे त्यांच्या शिक्षणाला ब्रेक लागतो. अशी स्थिती असली तरी जी कुटुंबे या ठिकाणी वास्तव्य करतात त्या कुटुंबातील मुलांसाठी मराठे महाविद्यालयाने हातिवले शिंदेवाडी येथे चिरेखाण शाळा सुरू केली आहे.

Chirekhan School Ratnagiri
Satara Lok Sabha : 'या' गावातील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; काय आहे नेमकं कारण?

शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विशेषतः परप्रांतीय मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मराठे महाविद्यालयातर्फे चिरेखाण शाळा हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याला पालकांसह विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर ते एप्रिलदरम्यान ही शाळा सुरू राहणार आहे. भविष्यातील नियोजन आत्तापासून सुरू केले आहे. या उपक्रमासाठी प्राध्यापक मेहनत घेत आहेत.

-डॉ. राजाराम राठोड, प्राचार्य, आबासाहेब मराठे महाविद्यालय

चिरेखाण शाळा सुरू करण्याचा उद्देश

  • स्थलांतरित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात येण्यासाठी वातावरण निर्मिती करणे

  • आवश्यकतेनुसार जवळच्या शाळेत विद्यार्थ्याची पटावर नोंदणी करणे

  • अंकगणित ज्ञान आणि वाचन, लेखन कौशल्याचा विकास करणे

  • मनोरंजनातून शिक्षण देणे

  • शिक्षणाची आवड निर्माण करणे

Chirekhan School Ratnagiri
Satara Lok Sabha : 'शरद पवारांकडून उमेदवारी मिळालेला नेता विजयी होणार'; माजी सहकारमंत्र्यांना विश्वास

शाळेचे असे आहे स्वरूप

  • आठवड्यातून चार दिवस दोन तास शिकवणी

  • विद्यार्थी स्वयंसेवकाची अध्यापनासाठी नियुक्ती

  • शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप

  • विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी विद्यार्थी वाढदिवस साजरे करणे

  • मराठी आणि हिंदी भाषेतून मुलांशी संवाद

  • गाणी वा अन्य उपक्रमांद्वारे शैक्षणिक अभिरूची निर्मितीचे प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com