RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने १० मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
 education rte admission application extension till 10th may
education rte admission application extension till 10th maySakal
Updated on

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने १० मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आरटीईअंतर्गत राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या.

या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यंदा आरटीईच्या तरतुदी बदल केला असून आता २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी सरकारी, अनुदानित शाळांमधील प्रवेशाचा पर्याय प्राधान्याने दिसणार आहे.

संबंधित बालकांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तरच अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यित शाळेत मुलांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश मिळेल, असे राज्य सरकारने नव्या निर्णयाद्वारे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टलवर खासगी शाळांसह सरकारी आणि अनुदानित शाळांनी नोंदणी केल्याचे दिसून येते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ७६ हजार ५२ शाळांमधील आठ लाख ८६ हजार ४११ जागांकरिता मंगळवारी रात्रीपर्यंत केवळ ६२ हजार २७७ अर्ज आले होते.

आरटीईत सरकारने बदल केल्यामुळे पालकांनी या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नोंदणीला अल्प प्रतिसाद दिल्याचे दिसून येते. अधिकाधिक पालकांनी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होत, बालकांच्या शाळा प्रवेशासाठी अर्ज भरावेत, यासाठी शिक्षण विभागातर्फे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

आता पालकांना आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता १० मे पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार असल्याचे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.