Educational News : दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज स्वीकारण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

अर्ज भरून झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांना अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाणार आहे.
Students_College
Students_Collegesakal
Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नावनोंदणी अर्ज करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खासगी विद्यार्थ्यांना आता २० ते ३० सप्टेंबर दरम्यान अर्ज करता येणार आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाइन अर्ज नियमित शुल्काने स्वीकारण्यात येत होते. या अंतर्गत दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदत होती. परंतु आता, नियमित शुल्काने नावनोंदणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला (मुळ प्रत), आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो ऑनलाइन अर्ज भरताना स्कॅन करून अपलोड करायचा आहे. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी देणे अनिवार्य आहे. अर्ज भरून झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांना अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाणार आहे. तसेच संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्काची पावती आणि हमीपत्र यांसह दोन प्रतीत विद्यार्थ्यांनी काढून घ्याव्यात, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली.

Students_College
Pune News : पुण्यात तीन परवाना निरीक्षक निलंबित

अशी आहे मुदतवाढ :

तपशील : कालावधी

- विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाइन भरणे : २० ते ३० सप्टेंबर

- विद्यार्थ्यांनी मुळ अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे : २२ सप्टेंबर ते  ३ ऑक्टोबर

Students_College
Satara News : पृथ्वीराज चव्हाणांच्या मागणीनंतर नितीन गडकरींनी दिले 'हे' आदेश

माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावती एक छायाप्रत मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे : ५ ऑक्टोबरपर्यंत

अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ:

दहावीसाठी : http://form17.mh-ssc.ac.in

बारावीसाठी : http://form17.mh-hsc.ac.in

Students_College
Pune Ganeshotsav Parking : पुण्यातील गणेशोत्सवात वाहनांसाठी पार्किंगची ठिकाणे झाली निश्चित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.