यशस्वी होण्याची 'अष्टसूत्री'

करिअरमध्ये यश मिळवायचे असेल, तर खालील आठ ‘स्टेप्स’चा प्रभावशाली वापर करा...
eight effective steps for career success
eight effective steps for career successsakal
Updated on

शैक्षणिक अभ्यासक्रमाची एखादी परीक्षा असो किंवा स्पर्धा परीक्षा, कोणत्याही परीक्षेत यश मिळण्यासाठी नियोजन करावं लागतं. जे आपण ठरवतो, त्याची अंमलबजावणीदेखील तेवढ्याच सजगतेने आणि सक्षमपणे करावी लागते. त्यात हलगर्जीपणा झाला की, यश आणखी लांब जातं. त्यामुळे करिअरमध्ये यश मिळवायचे असेल, तर खालील आठ ‘स्टेप्स’चा प्रभावशाली वापर करा

1. लवकर सुरुवात...

लवकर आणि चांगली सुरवात करणं म्हणजेच अर्धी मोहीम फत्ते झाल्यासारखं असतं. त्यामुळेच स्पर्धा परीक्षेची तयारी आपल्या शाळा-महाविद्यालयापासूनच करणं गरजेचे आहे. पुढे जाऊन एमपीएससी, यूपीएससी, बॅंकिंग इ. परीक्षा सोप्या करायच्या असतील, तर इंग्रजीकडे विशेष लक्ष द्या. शिक्षण घेत असताना बातम्या पाहणं व वाचणं महत्त्वाचे आहे. देश-विदेशातील घडणाऱ्या घटनांचा होणारा परिणाम आणि प्रभाव अभ्यासणं आवश्‍यक आहे. उमेदवारांचे सर्वंकष ज्ञान तपासले जाते, जे कुठल्याही ‘शॉर्टकट’ किंवा ‘फास्ट फॉरवर्ड’ अभ्यास पद्धतीने मिळत नाही. त्यामुळे आधीपासूनच चौफेर वाचन ठेवा.

2. ‘बेसिक्‍स’मध्ये चूक नको

विविध ‘पॅटर्न्स’ची (एनसीईआरटी वगैरे) आठवी ते १२ वी पर्यंतची पुस्तके वाचणं फायद्याचं ठरतं. या पुस्तकांमधील मूलभूत माहिती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे पाया पक्का होतो. संकल्पना स्पष्ट होतात. स्पर्धा परीक्षेतील बरेचसे प्रश्‍न यावर आधारित असतात.

3. बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान

कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीतील प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी उमेदवाराने गतिमान आकडेमोड, विश्‍लेषण करणं आवश्‍यक असतं. त्यासाठी पाढे पाठ असणं, वर्ग, घनसंख्या यांचं पाठांतर असल्यास निश्‍चितच फायदा होतो. वाचनातूनच आजूबाजूच्या घटनांचा वेध घेता येतो, विचार प्रगल्भ होतात.

eight effective steps for career success
Foreign Education Explained : परदेशात शिक्षणासाठी जाण्याआधी लक्षात ठेवा या पाच गोष्टी

4. गणिताशी करा दोस्ती

गणित हा कठीण वाटणारा विषय मानला जातो, पण स्पर्धा परीक्षेत तो वेगळी कलाटणी मिळवून देऊ शकतो. मात्र, त्यासाठी गणिताचा पाया शालेय जीवनापासूनच पक्का केला पाहिजे. कारण बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेत गणिताचा स्तर हा दहावीपर्यंतचा असतो. यामध्ये काळ, काम, वेग, नातेसंबंध, दिशा, तर्कशुद्ध युक्तिवाद इ. बाबींवर प्रश्‍न विचारले जातात. कमीत कमी वेळात उत्तरे देण्याची चपळता अंगी असणे गरजेचे आहे. एक गणित ४० सेकंदांच्या आत सोडवायचे असते. ‘वेदिक मॅथ’चाही बराच फायदा होतो.

5. इंग्रजीची भीती नको

इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी सर्वप्रथम इंग्रजीची भीती मनातून काढून टाका. आपण चुकलो किंवा अडखळलो तरी चालेल, पण इंग्रजी लिहिण्याची व बोलण्याची सवय ठेवलीच पाहिजे. याची सुरवात कशी करावी? तर, ग्रामरकडे लक्ष द्या. इंग्रजी वर्तमानपत्र वाचा. कालांतराने हळूहळू लहान-मोठ्या पुस्तकांकडे मोर्चा वळवा. इंग्रजी वाहिन्यांवरील विविध कार्यक्रम, बातम्या, परिसंवाद व चर्चा ऐकण्याने आपले शब्दोच्चार, बोलण्याची शैली इत्यादी सुधारण्यास मदत होईल

eight effective steps for career success
नोकरीच्या शोधात आहात ! मग ‘स्मार्ट सारथी’ला भेट द्या

6. वेळेचं भान

वेळेच्या सदुपयोगाची सवय आपल्याला जाणीवपूर्वक लावावी लागते. त्यासाठी पहिले पाऊल म्हणजे वक्तशीरपणा! निग्रह आणि सततचा सराव यामुळे हा गुण साध्य होतो. आपण किती झोपतो, किती वाजता उठतो, किती वेळ जागरण करतो, किती वेळ टाइमपास करतो याचा विचार करा. कुठला विषय अधिक व कुठला कमी महत्त्वाचा, कुठला सोपा व कुठला कठीण इ. बाबी डोळ्यांसमोर ठेवून वेळेचं नियोजन करा. सोशल मीडिया, मोबाइलचा वापर गरजेपुरता करा.

7. हस्ताक्षर

सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असं म्हटलं जातं. मात्र, हा दागिना घडवावा लागतो. आपल्याला स्पर्धेत टिकायचं असेल, तर केवळ आपलं ज्ञान चौफेर असून भागणार नाही, तर त्याचं सादरीकरणही चांगले हवं. त्यासाठी सुंदर हस्ताक्षर ही पहिली, तर लेखनशैली ही दुसरी पायरी आहे.

8. सर्वांगीण विचार

तीन महत्त्वाच्या बाबी आहेत - करिअरशी निगडीत अभ्यास आणि ज्ञान (नॉलेज), करिअरसाठी आवश्‍यक गुणकौशल्ये (स्किल्स), करिअरला पूरक असा वृत्तीतील बदल (ॲटिट्यूड). याप्रमाणे बदल करावे लागतात. उदा. पोलिस होण्यासाठी तल्लख बुद्धिमत्ता, तंदुरुस्त व चपळ शरीर असावे लागते. सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रगतीसाठी लॉजिक लागते. त्यामुळे जशी कार्यक्षेत्रे बदलतात तशी जीवनपद्धती व वर्तणूक बदलावी लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.