प्रा. विजय नवले
फिजिक्स हे शास्त्र म्हणजेच विज्ञान आहे, तर इलेक्ट्रॉनिक्स हे त्यातून तयार झालेले त्याचेच उपयोजित नवे रूप. मागील काही दशकांपासून इलेक्ट्रॉनिक्स हे आधुनिक जगाच्या वेगवान प्रगतीचे कारण बनले आहे. आजच्या युगातील अतिवेगवान प्रगतीच्या मुळाशी इलेक्ट्रॉनिक्स आहे. टेलिकम्युनिकेशन्स, संगणक, आयटी, रोबोटिक्स, ऑटोमेशन आदी सर्व तंत्रज्ञानाचा पाया इलेक्ट्रॉनिक्स आहे. इलेक्ट्रॉनिक्स संदर्भातील पदवी शिक्षण जसे अभियांत्रिकीच्या माध्यमातून आहे, तसेच विज्ञान शाखेतून बीएससी इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच बॅचलर ऑफ सायन्स इन इलेक्ट्रॉनिक्स या स्वरूपाचा कोर्स आहे.