Eleventh Admission : अकरावीच्या प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना मिळणार शेवटची संधी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी आता शेवटची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
sakal
Eleventh AdmissionEleventh Admission
Updated on

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी आता शेवटची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी ‘दैंनदिन गुणवत्ता फेरी’चे आयोजन करण्यात आले असून ही फेरी येत्या शनिवारपर्यंत (ता. ५) राबविण्यात येणार आहे.

यंदा ३४३ महाविद्यालयांमधील एकूण एक लाख २० हजार ८०५ जागांसाठी एक लाख तीन हजार ८०४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यापैकी एकूण ७८ हजार २१९ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला आहे.

दरम्यान, अद्यापही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. अकरावी प्रवेशाच्या आतापर्यंत तीन नियमित आणि सहा विशेष फेऱ्या झाल्या आहेत. आता दैंनदिन गुणवत्ता फेऱ्या म्हणजे सतत विशेष फेरीत गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिले जात आहेत.

यात निवडलेल्या आणि प्रतीक्षाधीन विद्यार्थ्यांची यादी दररोज सकाळी दहा वाजता घोषित केली जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना दररोज नव्याने अर्ज करावा लागेल. सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशीपर्यंत दैनंदिन गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थी अर्ज करू शकतील. विद्यार्थी त्याच्या पसंतीच्या अर्जामध्ये किमान एक आणि कमाल १० विद्यालयांची पसंती नोंद करू शकतील.

प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशीच्या गुणवत्ता यादीसाठी दिलेल्या वेळेत अर्ज करावा लागेल. विद्यार्थ्यांची प्रत्येक विद्यालयाच्या यादीतील स्थान (निवड किंवा प्रतीक्षा क्रमांक) विद्यार्थ्यांना दाखवली जाईल. विद्यार्थी निवड झालेल्या कोणत्यही कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी जाऊ शकतो. विद्यार्थ्यांनी आपली प्रतीक्षा यादीतील रॅंक तपासून दररोज अर्जाचा भाग दोनमध्ये पसंती क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.

इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची आकडेवारी :

तपशील : रिक्त जागा - झालेले प्रवेश - रिक्त जागा

‘कॅप’अंतर्गत जागा - १,०४,१२९ - ६८,९२० - ३५,२०९

‘कोट्या’अंतर्गत जागा - १६,६७६ - ९,२९९ - ७,३७७

एकूण जागा - १,२०,८०५ - ७८,२१९ - ४२,५८६

विद्यार्थी-पालकांसाठी सूचना -

- या फेरीत सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत विद्यार्थी निवडलेल्या महाविद्यालयात त्यांचा प्रवेश निश्चित करू शकतात.

- प्रवेश अर्जाचा भाग एक भरून तो प्रमाणित झालेल्या विद्यार्थ्यांना भाग दोनमध्ये पसंतीक्रम देऊन फेरीत सहभागी होता येईल.

- विद्यार्थ्यांने आपली प्रतीक्षा यादीतील रॅंक तपासून दररोज अर्जाच्या भाग दोनमध्ये पसंतीक्रम नोंदवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.