मुंबई : कोरोनामुळे (Corona) अर्थव्यवस्थेत झालेल्या सुधारणेचा परिणाम आता नोकरभरतीवरही दिसून येत आहे. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत मार्च महिन्यात नोकऱ्यांच्या भरतीत सहा टक्क्यांनी (Employment Increased) वाढ झाली आहे. कंपन्यांमधील नोकरभरतीच्या बाबतीत मुंबई 21 टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
विविध क्षेत्रांमधून गोळा केलेल्या अहवालानुसार, विविध कंपन्यांनी नोकरभरती वाढवली आहे. मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्स (एमईआय) ने 13 शहरांमध्ये सर्वेक्षण केले. त्यामधून ही बाब समोर आली आहे. यामध्ये ऑनलाइन भरतीप्रक्रियेचा अभ्यास करण्यात आला. त्याची गेल्या वर्षीच्या भरतीप्रक्रियेसोबत तुलना केली असता सहा टक्क्यांची वाढ दिसून आली.
१३ शहरांमध्ये रोजगारात वाढ -
कंपन्यांमधील भरतीच्या बाबतीत मुंबई 21 टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईत सर्वाधिक रोजगार उपलब्ध झाले आहेत. कोईम्बतूर, चेन्नई आणि हैदराबाद 20 टक्के वाढीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच कोलकाता आणि दिल्ली एनसीआरमध्ये रोजगारामध्ये १३ टक्क्यांची वाढ दिसून आली.
उत्पादन क्षेत्रात 16 टक्क्यांनी रोजगार वाढले -
अहवालानुसार, पुण्यात उत्पादन क्षेत्रातील भरतीत 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च 2022 च्या आकडेवारीनुसार, बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा कंपन्यांमध्ये भरतीसाठी सर्वाधिक मागणी दिसून आली. भरतीचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ३७ टक्के होते. दूरसंचार क्षेत्रात 17 टक्क्यांची सुधारणा दिसून आली, तर उत्पादन क्षेत्रात 16 टक्क्यांनी नोकरभरती वाढली.
KVIC ने 8.25 लाख नोकऱ्या निर्माण केल्या
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) 8.5 लाख नोकऱ्या निर्माण केल्या आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) अंतर्गत 2021-22 मध्ये एक लाख युनिट्सची स्थापना केली. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत त्यात ३९ टक्के वाढ झाली आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर KVIC ने एकाच आर्थिक वर्षात एक लाखाहून अधिक युनिट्स बसवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.