अभियांत्रिकीत आयटी, कॉम्प्युटर सायन्सला डिमांड

मेकॅनिकल, सिव्हिल या कोअर शाखांमध्ये शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Engineering
EngineeringSakal
Updated on

नागपूर : राज्याच्या सीईटी सेलमार्फत (CET Cell) सुरू असलेल्या अभियांत्रिकी प्रवेशाच्या (Engineering Admission) दुसऱ्या फेरीतील अलॉटमेंटची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. मात्र, पहिल्या यादीनुसार अभित्रिकींच्या प्रवेश प्रक्रियेत आयटी, कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, आर्टिफिशल इंटेलिजन्स यासारख्या विषयात प्रवेश फुल्ल झाले आहे. मात्र, मेकॅनिकल, सिव्हिल या कोअर शाखांमध्ये शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नागपूर विभागात असलेल्या ४८ अभियांत्रिकी महाविद्यालयात १७ हजारावर जागांचा समावेश आहे. एकेकाळी २० हजारावर जागा असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विविध शाखा बंद करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आले. याशिवाय पाच ते सात महाविद्यालये बंद करण्यात आली. त्यामध्ये मोठ्या संस्थामधील महाविद्यालयांचा समावेश आहे. याशिवाय काही महाविद्यालयांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्नता घेतल्याचे दिसून आले.

Engineering
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, ही क्षुल्लक गोष्ट

राज्याच्या सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्यात आले. त्याची अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आल्यावर २९ नोव्हेंबरपासून प्रवेश फेरीस सुरुवात करण्यात आली. १ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑप्शन फार्म भरण्यात आले. त्यानुसार ४ ते ७ डिसेंबरपर्यत विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीचे प्रवेश नोंदविले.

मात्र, यामध्ये विद्यार्थ्यांनी सर्वाधिक आयटी, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि आयटीशी संबंधीत यासारख्या विषयांना पसंती दिली. त्यामुळे मेकॅनिकल, इलेक्टीकल, इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या कोअर शाखांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. आजपासून दुसऱ्या प्रवेश सुरू झाले. २३ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे.

अधिक पॅकेजमुळे गर्दी

सध्या देशात आयटीची मोठी बुम आहे. त्यामुळे या कंपन्यांमध्ये अधिक रोजगाराच्या संधी आहे. दुसरीकडे आयटी आणि त्याचेशी संबंधीत असलेल्या शाखांमधील विद्यार्थ्यांना कंपन्यांमार्फत अधिक पॅकेज मिळते. त्यामुळे यामागे धावणाऱ्या विद्यार्थ्यांकडून या शाखांमध्ये गर्दी केल्याचे दिसून येते. मात्र, बऱ्याच आयटी कंपन्यांमध्ये मेकॅनिकल शाखेतील विद्यार्थी अधिक सरस ठरत असल्याचे दिसून येते हे विशेष.

Engineering
वर्धा : चोंडी शिवारात काळविटाची मटण पार्टी; चौघे ताब्यात

असलेल्या जागा

अभियांत्रिकी -

राज्य - १,३४,३५६

नागपूर विभाग - १७ हजार

अशा आहेत तारखा

१७ ते २३ डिसेंबर - सर्व प्रकारच्या महाविद्यालयातील रिक्त जागांवर प्रवेश

२३ डिसेंबर - महाविद्यालयांनी कट ऑफ यादी जाहीर करणे

२४ डिसेंबर - प्रवेशाची यादी अपलोड करण्याची अंतिम तारीख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.