- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ
इंजिनिअरिंग कंपनीमधील काम हे यंत्रसामग्री, आधुनिक तंत्रज्ञान, कच्चा माल, भांडवल, मनुष्यबळ, ऊर्जा आदींवर अवलंबून असते. कंपनीमध्ये कच्च्या मालापासून अंतिम उत्पादन निर्माण केले जात असते, परंतु हे करताना जास्तीत जास्त उत्पादकता, कामाच्या सुयोग्य पद्धती, सुरक्षित कार्यप्रणाली, कामाचे सर्वंकष व्यवस्थापन अशा अनेक गोष्टी अधिक सक्षमपणे करणे अपेक्षित असते.
आज व्यवस्थापनाच्या प्रगतशील पद्धती जागतिक स्तरावर अवलंबल्या जात असताना इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ही ज्ञानशाखा अत्यंत वेगळी आणि महत्त्वाची मानली जाते. गुणवत्तेच्या अनेक निकषांचा मागोवा कसा घ्यावा याचे आदर्श मार्ग या शाखेच्या अध्ययनातून कळतात. अगदी मानवी शरीराच्या रचनेचा विचार करून प्रॉडक्ट डिझाईन पासून प्रॉडक्शन प्रोसेस कशा असाव्यात असा अत्यंत कुतूहलाचा अभ्यासदेखील या शाखेत आहे.
कालावधी व पात्रता
बारावी सायन्सनंतर चार वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे, तर डिप्लोमा इंजिनीअरिंगनंतर तीन वर्षांची ही पदवी आहे. बारावी सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स हे विषय घेऊन बोर्डाच्या परीक्षेत ‘पीसीएम’ ग्रूपमध्ये ४५% (४०% मागासवर्गीय प्रवर्गांसाठी) गुण असावेत. पीसीएम ग्रूपमध्ये एमएचटी सीईटी प्रवेशपरीक्षेमध्ये शून्यापेक्षा अधिक पर्सेन्टाइल असावे. मेरिटसाठी सीईटीच्या गुणांचा विचार केला जातो. ‘जेईई मेन’च्या गुणांवरदेखील काही जागा उपलब्ध असतात.
कोर्सचे स्वरूप
चार वर्षांच्या अभ्यासक्रमात थिअरी लेक्चर्स सोबत प्रॅक्टिकल्स असतात. इंजिनिअरिंगच्या अभ्यासासोबतच व्यवस्थापन कौशल्ये विकसित केली जातात. इन-सेम, एन्ड-सेम, तोंडी परीक्षा अशा विद्यापीठीय परीक्षांसोबतच ट्युटोरियल्स, युनिट टेस्ट्स अशा महाविद्यालयीन परीक्षा असतात. असाइन्मेंट्स आणि सबमिशन हे महत्त्वाचे भाग या अभ्यासक्रमाचे आहेत.
इंडस्ट्रियल व्हिजिट्सच्या माध्यमातून अभियांत्रिकी आस्थापनांची जवळून तोंडओळख करून दिली जाते. आयएसओ, फाईव्ह एस, सिक्स सिग्मा अशा नवनवीन मॅनेजमेंट संबंधित कोर्सेस करता येतात. प्रोजेक्ट वर्क आणि संबंधित तांत्रिकी उपक्रम नीटपणे केल्यास विद्यार्थी पुढील कामासाठी स्पर्धात्मकदृष्ट्या तयार होतात. इंटर्नशिप चांगल्या प्रकारे करण्याची संधी मिळाली, तर करिअरचा पाय पक्का झाला असे समजायला हरकत नाही.
अभ्यासायचे विषय
मॅनेजमेंट सायन्स, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग इकॉनॉमी, कॉस्टिंग अँड अकाउंटिंग, प्रॉडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल, ऑपरेशन्स रिसर्च, फॅसिलिटी लेआउट अँड डिझाइन, मशीन टुल्स अँड मशिनिंग, मॅनेजमेंट ऑफ इन्व्हेंटरी सिस्टिम्स, मॅथेमॅटिक्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, मटेरियल्स मॅनेजमेंट, मटेरियल हँडलिंग, स्टोअर्स मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल सेफ्टी, क्वालिटी मॅनेजमेंट, पोल्युशन कंट्रोल, बायोमेकॅनिक्स, अर्गोनॉमिक्स, लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट, प्रॉडक्ट डिझाइन, प्रोसेस डिझाइन, मॅनेजमेंट टेक्निक्स, इंडस्ट्रियल लॉ, रोबोटिक्स, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, स्टॅटिस्टिक्स, प्रॉडक्शन मॅनेजमेंट आदी विषय या अभ्यासक्रमात अभ्यासात येतात.
स्कोप
या पदवीधरांना अभियांत्रिकी, तसेच मॅनेजमेंटचे ज्ञान असल्याने मॅनेजमेंट टीममध्ये सुरुवातीपासूनच स्थान मिळते. क्वालिटी मॅनेजमेंट, सेफ्टी डिपार्टमेंट, फॅसिलिटी मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी, प्रॉडक्शन प्लॅनिंग, ऑपरेशन्स आदी आघाड्यांवर नोकरीची संधी मिळते. या शाखेतील पदवीधरांची संख्या कमी असल्याने नोकरीच्या फार समस्या येत नाहीत.
ज्युनिअर मॅनेजर, मॅनेजर, सिनिअर मॅनेजर तसेच याही वरील पदांवर काम करता येते. अर्गोनॉमिक्स म्हणजेच मानवी शरीराचा विचार करून असलेल्या रचना. इंडस्ट्रियल इंजिनिअर्सना प्रॉडक्ट डिझाइन, अर्गोनॉमिक्स यामध्ये संधी आहेत. प्रॉडक्टिव्हिटी हा क्षेत्रीतल तज्ज्ञांना कन्सल्टन्ट म्हणून खूप मोठ्या संधी मिळतात.
नवीन इंडस्ट्रियल प्लान्टचे निर्माण करताना चांगल्या पगाराच्या संधी असतात, कारण या विषयामध्ये नैपुण्य असणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. तोट्यामध्ये असणारी एखादी कंपनी फायद्यामध्ये नेण्याची जबाबदारी घेता येण्याची क्षमता या शिक्षणानंतर आणि संबंधित अनुभवानंतर शक्य असते.
काम करण्याच्या जुन्या पद्धती, चुकीचे लेआउट, असुरक्षित वातावरण, अप्रशिक्षित कर्मचारी, मटेरियल हाताळण्याच्या सदोष पद्धती अशा अनेक बाबतीत सल्ला देण्यासाठीची पारंगतता या पदवीधरांमध्ये कामाच्या अनुभवानंतर येते. त्यामुळे या विषयातील सल्लागारांचे मोठे करिअर यांना उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.