आपण सर्व जण अगदी लहानपणी लिहायला शिकतो. मात्र, अर्थपूर्ण कसं लिहायचं? नेटकं, नेमकं, अचूक कसं लिहायचं? हे शिकायला खूप वेळ लागतो. त्यामुळेच लेखन हीदेखील एक कला मानली जाते. अनेक प्रसिद्ध लेखकांचे लेखन वाचताना आपण हरखून जातो..आपणही त्यांच्यासोबत त्या काळात रमतो. त्यांची सुख-दुःखे आपलीच होऊन जातात. हे साध्य होते, ते केवळ लिखाणामुळे! परीक्षेत अशा प्रकारचे ललित, भावनिक लिखाण करायचे नसले, तरी मुद्देसूद लिहिणे, निबंध अधिकाधिक आकर्षक व आशयघन करणे यासाठी लेखनकौशल्ये लागतातच. ही कौशल्ये वाढविण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत -.हस्ताक्षर : तुम्हाला एखाद्या विषयाची संपूर्ण माहिती आहे, अभ्यास चांगला झाला आहे, पण जर ते नीट लिहिलेच जात नसेल, तुमचे अक्षर वाचताना अडचण येत असेल किंवा त्यातून अर्थाचा अनर्थ होत असेल, तर तुमचे गुण कमी होऊ शकतात. हल्ली मोबाइल, संगणकामुळे हाताने लिहायची सवय कमी होताना दिसते. मात्र, परीक्षेत हातानेच लिहायचे असते हे लक्षात ठेवा. त्यामुळे हाताने लिहायचा सराव करा. अनेक जणांना सराव नसतो आणि मग ऐन वेळी परीक्षेत उत्तरे लिहिताना त्यांचे हात दुखतात. उत्तर येत असूनही वेग कमी पडतो. त्यासाठी लिहिण्याचा व हस्ताक्षर सुधारण्याचा सराव करा..मुद्देसूद मांडणी : कोणत्याही प्रश्नाचे उत्तर लिहिताना ते मुद्देसूद लिहा. तो प्रश्न किती गुणांसाठी विचारला आहे हे पाहून त्यानुसार उत्तर लिहा. खूप कमी किंवा खूप जास्त उत्तरे लिहू नका. खूप कमी लिहिल्यास प्रश्नाच्या उत्तराला न्याय दिला जाणार नाही आणि त्याचा गुणांवरही परिणाम होईल, तसेच खूप जास्त लिहिल्यास त्यात इतर माहितीचा भरणा जास्त होऊन पेपर तपासणारी व्यक्ती कंटाळेल आणि त्याचाही विपरित परिणाम गुणांवर होऊ शकतो. त्यामुळे मुद्देसूद मांडणी करा. १,२,३.. अशा प्रकारे आकडे घालून मुद्दे मांडल्यास लिहायला सोपे जाते आणि तपासणाऱ्यास ते पटकन कळते..संदर्भांचा वापर : उत्तरे लिहिताना आवश्यक तिथे संदर्भांचा वापर करा. महत्त्वाच्या घटना, प्रसंग यांची तारीख, वार, महापुरुषांची वाक्ये वगैरे लिहिताना त्यांचा संदर्भदेखील द्या. संदर्भ शक्यतो मूळ लेखकाच्या पुस्तकाचा किंवा विविध कोशांचा द्यावा. कथा-कादंबरी यांचा शक्यतो देऊ नये. संदर्भ अचूक असावेत. त्यात लेखक, प्रकाशकांची नावे चुकू नयेत. संदर्भांचा वापर आवश्यकता असल्यासच करावा. केवळ उत्तराचा आकार वाढवण्यासाठी संदर्भ देत बसू नये. त्यामुळे मूळ गाभ्यापासून आपण लांब जाण्याची शक्यता निर्माण होते..अनावश्यक माहिती नको : कोणताही लेख, उत्तर, निबंध लिहिताना त्यात अनावश्यक माहितीचा भरणा करू नका. म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते, इंग्रजी वाक्ये, शेरोशायरीचा वापर प्रमाणात असावा. दर दोन-तीन ओळींनी काही तरी अलंकारिक टाकू नये. त्यामुळे मूळ विषयाची मांडणी कमी आणि इतरच गोष्टी जास्त होतात. तुमचे लिखाण अभ्यासपूर्ण न होता, ते केवळ अलंकारिक म्हटले जाते. परीक्षेत अभ्यासू मांडणी अपेक्षित असते. तुमची चुणूक दाखवण्यासाठी एखादा भाषिक अलंकार वापरणे ठीक आहे. मात्र, त्याचा भडिमार नको..सराव : सरावाला पर्याय नाही. परीक्षेच्या वेळात सर्व उत्तरे सोडविण्यासाठी, उपलब्ध वेळात पटापट लिहिण्यासाठी, वेग वाढला तरी अक्षर खराब होऊ नये यासाठी सराव करावाच लागेल. त्याला पर्याय नाही. त्यामुळे मुद्देसूद लिहिण्याचा सराव करा. रोज एक पान मराठी व इंग्रजी लिहा. नमुना प्रश्नांची उत्तरे लिहून ती कोणाकडून तरी तपासून घ्या. तुम्ही लिहिलेल्या उत्तरांवर चर्चा करा. त्यामुळे तुम्हाला नवी दिशा मिळेल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.