कऱ्हाड (सातारा) : राज्यातील पदविका अभियांत्रिकी (डिप्लोमा) Engineering Diploma अभ्यासक्रमाची प्रथम वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. एकाच ऑनलाइन अर्जाव्दारे राज्यातील कोणत्याही तंत्रनिकेतनातील कोणत्याही शाखेत प्रवेश घेता येऊ शकेल. या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आलीय. त्यानुसार २७ ऑगस्ट पर्यंत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी Online Registration करता येणार आहे. ३० ऑगस्ट रोजी तात्पुरता मेरीट नंबर कळेल. ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान त्रुटींची दुरूस्ती झाल्यानंतर चार सप्टेंबरला अंतिम मेरीट नंबर जाहीर होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील (Principal Dr. Rajendra Patil) यांनी आज दिली.
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात किमान एक शासकीय तंत्रनिकेतन, तसेच काही विनाअनुदानीत तंत्रनिकेतने आहेत.
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात किमान एक शासकीय तंत्रनिकेतन (Government Technical College), तसेच काही विनाअनुदानीत तंत्रनिकेतने आहेत. या सर्व ठिकाणी विद्यार्थी आणि पालक यांना मदत करण्यासाठी सुविधा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार १३ ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार आहे. १७ ऑगस्ट रोजी तात्पुरता मेरीट नंबर कळणार होता आणि २३ ऑगस्टला अंतिम मेरीट नंबर कळणार होता. मात्र, शासनाने त्यामध्ये बदल केला आहे. त्यानुसार आता सुधारित वेळापत्रकानुसार २७ ऑगस्ट पर्यंत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. ३० ऑगस्ट रोजी तात्पुरता मेरीट नंबर कळेल. ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान त्रुटींची दुरूस्ती झाल्यानंतर चार सप्टेंबरला अंतिम मेरीट नंबर कळेल.
यानंतर संस्था आणि शाखा यांचे पर्याय भरून दिल्यानंतर जागावाटप होईल. त्याप्रमाणे जागा स्वीकृती व प्रत्यक्ष संस्था प्रवेश अशी प्रवेश प्रक्रिया असेल. प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थी आणि पालक यांना सुविधा केंद्रांची मदत मिळणार आहे. याच बरोबर थेट व्दितीय वर्षासाठीची प्रवेश प्रक्रियाही सुरू झालेली असून बारावी किंवा आयटीआय झालेले विद्यार्थी २३ ऑगस्टपर्यंत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करू शकतात. अधिक माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी कर्हाडच्या तंत्रनिकेतनातील प्रवेश समितीशी ( प्रा. हिंदूराव जाधव – ७३८५४०५५०७ , डॉ. राम शिंदे – ९४२२९१४९३५ , डॉ. बडगुजर – ९८६०४२९९८९) संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.