सामाजिक शास्त्रांमधील अत्यंत महत्त्वाचा, परंतु दुर्लक्षित राहिलेला विषय म्हणजे भूगोल! दरडी कोसळून रस्ते बंद झाले, पाऊस जोरात पडला किंवा पडलाच नाही, वादळांनी घराचे छप्पर उडून गेले, प्रदुषणाची पातळी प्रचंड वाढली की, मगच आपल्याला भूगोलाची आठवण होते. दोन जातीं-जमांतीमधे दंगली झाल्या, वनहक्कांसाठी रास्ता रोको झाले, सीमारेषेवर सैनिकांमधे गोळीबार झाला की, आपल्याला भूगोल आठवतो.