Fact Check : हातगाडी ओढणारी ती IAS तरुणी आहे तरी कोण?

Fact_Check_Viral
Fact_Check_Viral
Updated on

UPSC IAS Story : पुणे : यूपीएससी परीक्षा पास झालेल्या यशस्वीतांच्या अनेक सक्सेस स्टोरी सोशल मीडियात व्हायरल होत असतात. हलाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करत आकाशाला गवसणी घालणाऱ्यांची संख्या या जगात कमी नाहीय. शेतकरी, कष्टकरी, कामगार कुटुंबातून आलेले अनेक विद्यार्थी आपल्या अथक परिश्रमाच्या जोरावर आयएएस अधिकारी झाले. अशाच अधिकाऱ्यांच्या स्टोरी सोशल मीडियात व्हायरल होत असतात. 

आताही अशीच एक स्टोरी सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एका मुलीने यूपीएससीच्या परीक्षेत टॉप केलं आणि या आनंदात तिने आपल्या वडिलांना रिक्षात बसवून फिरवलं. हा फोटो सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहेत. सदर फोटोत पाठीवर बॅग असलेली एक मुलगी हातगाडी ओढताना दिसत आहे. हातगाडीमध्ये एक वयोवृद्ध माणूस बसलेला दिसतो. अशा प्रकारच्या हातगाड्या पश्चिम बंगालच्या कोलकत्ता शहरात चालवल्या जातात, पण हे सत्य नाहीय. 

Fact check -
श्रमोना पोद्दार नावाची एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणजे अशा व्यक्ती ज्या जगभरात फिरतात, आणि त्या प्रवासासंबंधीत फोटो, किस्से इतरांना सांगतात. श्रमोना ही सोशल मीडियात अॅक्टीव्ह असून ती कोलकत्तामध्ये राहत आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 1 लाख 20 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. कोलकत्तामध्ये फिरत असतानाचा एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. आणि सध्या तो फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

त्याचं झालं असं की, श्रमोना जेव्हा कोलकत्तामध्ये एका प्रोजेक्टनिमित्त फिरत होती तेव्हा तिला असे हातगाडी ओढणारे लोक दिसते. श्रमोनाने त्या लोकांना पाहिल्यानंतर त्यांची सहानुभूती वाटली. किती कष्टाचं काम करत आहेत ते, असं जाणवल्यामुळे तिनं हातगाडीत बसणं टाळलं, पण हातगाडी ओढणंच हीच त्यांची रोजीरोटी असल्याचे तिच्या लक्षात आले.

या हातगाडीमधून प्रवास न करणे म्हणजे त्यांचा रोजगार हिसकावून घेतल्यासारखं आहे. असं वाटल्याने श्रमोनाने हातगाडीत बसण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने हातगाडी चालवणाऱ्या काकांना मागे बसवून शोभा बाजार भागातून स्वत: हातगाडी ओढली. आणि हातगाडी ओढणं किती कष्टाचं काम असतं त्याचा अनुभवही घेतला. तिला हातगाडी ओढताना पाहून अनेकांनी तिचे फोटो काढले. आणि त्यापैकीच एका अज्ञात व्यक्तीने आयएएस टॉपर आणि तिचे वडील अशी भावनिक स्टोरी व्हायरल केली. अनेकांना ही गोष्ट आवडल्याने त्यांनी लगेच सोशल मीडियात शेअर केली. 

व्हायरल होणाऱ्या या फोटोमागचं सत्य काय आहे हे जेव्हा जाणून घेतल्यानंतर खरी माहिती पुढे आली आहे. श्रमोनाचा हा फोटो तिच्या भास्कर नावाच्या मित्राने काढला होता. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियात चुकीच्या माहितीसोबत व्हायरल होऊ लागल्यामुळे श्रमोनालाही वाईट वाटले. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनाही अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. यानंतर श्रमोनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहली असून खरे काय आहे ते सांगितले आहे.

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.