Fake Universities : एकट्या दिल्लीत किती बोगस विद्यापीठं? ‘यूजीसी’ने देशाची यादी केली जाहीर

विद्यार्थ्यांनी या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ नये
UGC List Released Fake Universities
UGC List Released Fake UniversitiesUGC List Released Fake Universities
Updated on

UGC List Released Fake Universities शिक्षण घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांची कमी नाही. अनेकजण बोगस प्रमाणपत्राच्या मदतीने नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कारवाईला सामोर जावे लागते. तरीही बोगस प्रमाणपत्र घेणारे दिसूनच येते. आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) (UGC) देशातील २१ बोगस विद्यापीठांची नावे जाहीर केली आहे.

यूजीसीच्या (UGC) अधिनियमांचे उल्लंघन करून देशात २१ बोगस विद्यापीठे सुरू असल्याचे यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी सांगितले. या विद्यापीठांमध्ये सर्वाधिक विद्यापीठे ही दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील आहेत. विद्यार्थ्यांनी अशा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ नये. बोगस विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊन पदवी घेतल्यास ती ग्राह्य धरल जाणार नाही, असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे.

UGC List Released Fake Universities
शिंदे गटाच्या आमदारांनी मोडला संकल्प; आदित्य ठाकरेंना म्हटले...

या संस्थांना बनावट विद्यापीठे म्हणून घोषित केले आहेत. त्यांना कोणतीही पदवी प्रदान करण्याचा अधिकार नाही, अशी माहिती यूजीसीने दिली. विद्यापीठ अनुदान आयोग कायदा १९५६, कलम २२ अन्वये असे नमूद केले आहे की, पदवी प्रदान करण्याचा किंवा प्रदान करण्याचा अधिकार केवळ केंद्रीय कायदा, प्रांतीय कायदा किंवा राज्य कायदा किंवा समजल्या जाणाऱ्या संस्थेद्वारे स्थापित किंवा समाविष्ट केलेल्या विद्यापीठाद्वारे वापरला जाईल.

बोगस विद्यापिठांची नावे

  • दिल्ली - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲण्ड फिजिकल हेल्थ सायन्सेस, कमर्शियल युनिव्हर्सिटी लि. दिव्यागंज, संयुक्त राष्ट्र विद्यापीठ, व्यावसायिक विद्यापीठ, एडीआर-सेंट्रिक ज्युरिडिकल युनिव्हर्सिटी, भारतीय विज्ञान आणि अभियांत्रिकी संस्था, विश्वकर्मा मुक्त विद्यापीठ, आध्यात्मिक विश्वविद्यालय

  • कर्नाटक - बडगनवी जागतिक मुक्त विद्यापीठ शिक्षण संस्था, बेळगाव (कर्नाटक)

  • केरळ - सेंट जॉन्स युनिव्हर्सिटी, किशनट्टम

  • महाराष्ट्र - राजा अरेबिक विद्यापीठ, नागपूर

  • पश्चिम बंगाल - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन ॲण्ड रिसर्च

  • उत्तर प्रदेश - गांधी हिंदी विद्यापीठ, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यापीठ, भारतीय शिक्षा परिषद

  • ओडिसा - नवभारत शिक्षा परिषद, रौरकेला, उत्तर ओरिसा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ

  • पुडुचेरी - श्री बोधी अकादमी ऑफ हायर एज्युकेशन

  • आंध्र प्रदेश - क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी, काकुमनुवरीथोटा, ग्रेस व्हिला ॲप्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()