प्रतिकूल परिस्थितीत निमगावच्या शेतकरीपुत्राने मिळवले CA परीक्षेत यश

प्रतिकूल परिस्थितीत निमगावच्या शेतकरीपुत्राने मिळवले सीए परीक्षेत यश
प्रतिकूल परिस्थितीत निमगावच्या शेतकरीपुत्राने मिळवले सीए परीक्षेत यश
प्रतिकूल परिस्थितीत निमगावच्या शेतकरीपुत्राने मिळवले सीए परीक्षेत यशCanva
Updated on
Summary

निमगाव टें (ता. माढा) येथील मंगेश पोपट सुरवसे हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत सीएची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.

कुर्डू (सोलापूर) : निमगाव टें (ता. माढा) येथील मंगेश पोपट सुरवसे (Mangesh Survase) हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत सीएची परीक्षा (CA Exam) उत्तीर्ण झाला आहे. जुलै 2021 मध्ये इन्स्टिट्यूट आँफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India) या संस्थेमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. चारशे गुणांच्या या परीक्षेत मंगेशने 209 गुण मिळवून यश संपादन केले आहे. मंगेश सुरवसे हा शेतकरी कुटुंबातील असून, त्याचे प्राथमिक व विद्यालयीन शिक्षण विठ्ठलराव शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला निमगाव टें, प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्रशालेमध्येच मराठी माध्यमातून झाले आहे. तर उच्च माध्यमिक शिक्षण बारामती व पुणे येथे पूर्ण केले.

प्रतिकूल परिस्थितीत निमगावच्या शेतकरीपुत्राने मिळवले सीए परीक्षेत यश
एकेकाळी पायात चप्पलही नव्हते, मात्र आज करतोय कोट्यवधींची उलाढाल!

वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असल्याने महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्याला मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. उच्च माध्यमिक शिक्षण घेत असतानाच मंगेशने सीए होण्याचे स्वप्न बाळगले होते. ते पूर्ण करण्यासाठी शिक्षण घेत असतानाच अनेक छोटी - मोठी डेली वेजेसवर खासगी नोकरी केली. त्यासाठी त्याला वडील पोपट, आई सुरेखा व मोठा भाऊ योगेश यांचे मोलाचे सहकार्य लाभले. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया या संस्थेमार्फत दर सहा महिन्याला परीक्षा घेतली जाते; परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षेला विलंब लागला होता.

प्रतिकूल परिस्थितीत निमगावच्या शेतकरीपुत्राने मिळवले सीए परीक्षेत यश
मुंबई महापालिकेत 'या' पदांची भरती! 24 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

सीएच्या परीक्षेसाठी एकूण आठ विषय असतात. आयएएस व आयपीएसच्या परीक्षेइतकीच सीएची परीक्षा देखील कठीण असल्याने पंधरा - पंधरा तास अभ्यास करावा लागत असल्याचे मंगेशने सांगितले. मंगेशच्या यशाबद्दल आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे व माढा वेल्फेअरचे अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे यांनी मंगेश व वडील पोपट यांना घरी बोलावून सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.